शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

दलालांचा दुकाने बंद ठेवून निषेध

By admin | Updated: January 21, 2015 01:06 IST

दलालमुक्त आरटीओ कार्यालयाच्या आदेशाने खळबळ.

अकोला : 'दलालमुक्त आरटीओ' करण्याचा आदेश राज्य परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी दिल्याने आरटीओ कार्यालय परिसरातील दलालांमध्ये खळबळ उडाली आहे. मंगळवारी कार्यालय परिसरात येण्यास दलालांना मनाई करण्यात आल्याने परिसरातील दलाल, मोटारवाहन प्रशिक्षण संस्थाचालकांनी त्यांची दुकाने बंद ठेवून आयुक्तांचा निषेध केला. दलालांच्या आंदोलनामुळे नागरिकांना थोडाबहुत त्रास सहन करावा लागला. राज्यातील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) दलालमुक्त करण्याचे राज्य परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार १२ जानेवारी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना पाठवलेल्या पत्रात तेथे दुकाने मांडलेल्या दलालांना काम करण्यास प्रतिबंध घालण्याचे म्हटले आहे. आरटीओच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कामकाजाची माहिती घेण्यासाठी १९ जानेवारीपासून आरटीओ कार्यालयांना अचानक भेटी देऊन निरीक्षण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आरटीओ कार्यालय परिसरातील दलालांमध्ये खळबळ उडाली आहे.रोजगार हिरावला जाण्याची भीती दलालांमध्ये निर्माण झाल्याने परिसरातील जवळपास १२५ दलाल व मोटारवाहन प्रशिक्षण संस्थाचालकांनी मंगळवारी सकाळी ११ पासून काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनामध्ये परिसरातील झेरॉक्स दुकानदार, इंटरनेट कॅफेचालकसुद्धा सहभागी झाले. दलालांनी राज्य परिवहन आयुक्तांच्या निर्णयाचा निषेध केला आणि आरटीओ कार्यालयामध्ये निदर्शने केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आरटीओ कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. नागरिकांना परवाना अर्ज न घेताच तेथून परतावे लागले.