शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अडचणीत; पीक विम्याचा आधारही मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:30 IST

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा आधार केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देगतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला.पाऊस झाल्याने, खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यां ना पीक विमा रकमेचा लाभ अद्याप मिळाला नाही.

- संतोष येलकर

अकोला: खरीप पेरण्या तोंडावर आल्या असताना, गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा रकमेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा आधार केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद इत्यादी पिकांचा शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. विमा हप्त्याची रक्कम (प्रीमियम) नॅशनल इश्युरन्स कंपनीकडे जमा करून, पीक विमा काढण्यात आला. गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना, गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यां ना पीक विमा रकमेचा लाभ अद्याप मिळाला नाही. खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असताना जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार शेतकऱ्यां ना पीक विमा रकमेचा आधार अद्याप मिळाला नसल्याने, पीक विम्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.खरीप पेरणी खर्चाची शेतकऱ्यांना चिंता!गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून पीक विम्याची रक्कम खरीप पेरणीपूर्वी मिळण्याची अपेक्षा केली जात आहे; मात्र खरीप पेरण्या तोंडावर आल्या तरी, पीक विमा रकमेचा लाभ मिळाला नसल्याने, शेती मशागतीसह खरीप पीक पेरणी, बियाणे व खतांचा खर्च भागविणार कसा, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकºयांपैकी किती शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला, याबाबतची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही, तसेच पीक विम्याची रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही.- राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी