शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक अडचणी समोर करून खासगी रुग्णालयांचा जनआरोग्य योजनेतून काढता पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 15:16 IST

अकोला: खासगी रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना प्रत्यक्षात राबविताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक रुग्णालये या योजनेतून काढता पाय घेत असल्याची माहिती आहे. परिणामी, गरीब रुग्णांसाठी उपचार महागडा ठरत आहेत.

अकोला: खासगी रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना प्रत्यक्षात राबविताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक रुग्णालये या योजनेतून काढता पाय घेत असल्याची माहिती आहे. परिणामी, गरीब रुग्णांसाठी उपचार महागडा ठरत आहेत.महात्मा जोतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजना गोरगरिबांसाठी संजीवनी ठरत आहे. योजनेंतर्गत अनेकांना खासगी रुग्णालयात उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळत आहेत; परंतु योजना राबविताना काही वैयक्तिक तर काही तांत्रिक अडचणींना समोर करून खासगी रुग्णालये योजनेतून काढता पाय घेत असल्याची माहिती आहे. जीवनदायी योजना राबविण्यासंदर्भात खासगी रुग्णालयांनी काही मागण्या लावून धरल्या आहेत. समस्या सोडविण्यासाठी खासगी केंद्रांनी राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे मागणी केली असून, यामध्ये प्रामुख्याने मान्यता प्राप्त खासगी रुग्णालयात खाटांची संख्या २५ ठेवण्यात यावी, तक्रारींसंबंधी रुग्णालय डॉक्टर, कर्मचारी यांच्यामार्फत शहानिशा व्हावी, त्यानंतरच तक्रारीचे स्वरूप देण्यात यावे, जास्त आजार असतात, असा रुग्ण असल्यास इतर आजारांच्या उपचारासाठी योजनेंतर्गत पॅकेज मंजूर होत नाही. पॅकेजमध्ये सर्व उपचार करण्याची सक्ती केली जाते. ‘ईटीआय’ घेतल्यानंतर जर रुग्णाने ७२ तासांच्या आत आवश्यक कागदपत्रे आणून दिली नाहीत, तर रुग्णाचे शुल्क जमा करण्याची जबाबदारी सोसायटीने घ्यावी, अनेक वेळा क्षुल्लक कारणांमुळे क्लेम रिजेक्ट केला जातो, अशा ‘क्लेम’ला मान्यता द्यावी, तांत्रिक त्रुटींसाठी अ‍ॅप्रुवल पेन्डिंग ठेवले जाते. त्रुटी तत्काळ सांगण्यात यावी, तीन दिवसांनंतर क्लेम नाकारला गेला, तर रुग्णांकडून शुल्काची मागणी त्रासदायक ठरते. रुग्णाला सुटी झाल्यानंतरही नातेवाईक घेऊन जात नाहीत. यासंबंधी मार्गदर्शन व्हावे, रुग्ण निर्धारित कालावधीत बरा न झाल्यास नवीन पॅकेज उपलब्ध करून द्यावे, योजना लागू झाल्यापासून पॅकेज रकमेत वाढ झाली नसल्याने रकमेत वाढ करण्यात यावी, यासह इतर अडचणींचा समावेश आहे.वैयक्तिक समस्यांचा त्रास रुग्णांनायोजना राबविताना अनेक खासगी रुग्णालयांच्या काही वैयक्तिक समस्या असतात. या समस्या समोर करूनही रुग्णांना उपचार देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची माहिती आहे. या धोरणाचा त्रास मात्र रुग्णांना सोसावा लागतो.यासंदर्भात जिल्हा स्तरावर बैठक झाली आहे. जिल्ह्यातील ११ रुग्णालयांमध्ये जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.-  सुनील वाठोरे, जिल्हा समन्वयक, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल