शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराच्या नव्या आदेशाला मुख्याध्यापकांचा विरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:44 IST

शाळांमध्ये नाचणी, बाजरीची भाकरी विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने साहित्य उपलब्ध करून दिलेले नाहीत.

अकोला: राज्य शासनाने नव्याने शालेय पोषण आहारामध्ये खिचडीसोबतच नाचणी, बाजरीची भाकरी उपलब्ध करून देण्याविषयी आदेश काढला आहे. या आदेशाला राज्यभरातील मुख्याध्यापकांनी विरोध दर्शविला आहे. शाळांमध्ये नाचणी, बाजरीची भाकरी विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने साहित्य उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाचणी, बाजरीची भाकरी कशी उपलब्ध करावी, स्वयंपाकी कोठून आणावा, असा प्रश्न उपस्थित केला आहे. शासनाने हा आदेश मागे घ्यावा, अन्यथा विदर्भ मुख्याध्यापक संघाच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी दिला आहे.विदर्भ मुख्याध्यापक संघाची राज्यस्तरीय बैठक नुकतीच यवतमाळ येथे पार पडली. या बैठकीमध्ये शालेय पोषण आहारात समावेश करण्यात आलेल्या नाचणी, बाजरीची भाकरी उपलब्ध करून देण्यासोबतच इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली. शासनाने हा आदेश तातडीने मागे घ्यावा, या आदेशामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरसुद्धा परिणाम होण्याची शक्यता मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. शासनाने विद्यार्थ्यांना नाचणी, बाजरीची भाकर उपलब्ध करून देण्याचा आदेश काढला; परंतु भाकरी कशी उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी साहित्य शासनाने उपलब्ध केले नाही. स्वयंपाकी उपलब्ध करावा तर त्याचे वेतन कोण देणार, त्यासाठी लागणारी भांडी, धान्य अद्याप दिले नाही. त्यामुळे अंमलबजावणी कशी करणार, असे प्रश्न मुख्याध्यापकांनी विदर्भ मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत उपस्थित केले आहेत. यासोबतच बैठकीत शासनाने नव्याने शैक्षणिक धोरण विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, तसेच तुकड्यांना अनुदान, समायोजन सुरू करून गणित, इंग्रजी, विज्ञानसारख्या शाळांना जागा उपलब्ध करून देणे, संचमान्यता दुरुस्त करणे, जि.प. प्राथमिक शाळांना वर्ग ५ ते ८ जोडण्याला विरोध आदी ठराव बैठकीत मंजूर करण्यात आले. बैठकीला विदर्भ सचिव सतीश जगताप, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोती खेडेकर, दीपक दोंदल, कार्याध्यक्ष अशोक पारधी, विलास भारसाकडे, रामप्रसाद धावडे, मंदा उमाठे, विनोद संगीतराव, दिनेश तायडे, बळीराम झामरे, रजिया बेग, प्रकाश बुमकाळे यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र