शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

प्रधानसेवक मोदी खोटे बोलत आहेत; अँड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:19 IST

प्रधानसेवक सातत्याने खोटे बोलत आहेत,  असे सांगत या प्रकाराचा निषेध ‘लुटारूंचा दिवस’ म्हणून भारि प-बहुजन महासंघ करणार आहे. नोटाबंदीमध्ये जीव गेलेल्यांना  श्रद्धांजली व निषेध कार्यक्रम प्रत्येक जिल्हा व तालुक्यात  घेण्याचे आवाहन पक्षाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले  आहे. 

ठळक मुद्देलुटारूंचा दिवस’ म्हणून  निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २0१६ रोजी  एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्या.  आरबीआयच्या कायद्यानुसार हा निर्णय सेंट्रल कमिटीच घेऊ  शकते, त्यानुसारची कार्यवाही आरबीआयकडून केली जाते.  सेंट्रल कमिटीने हा निर्णय घेतला की नाही, हे अद्यापही गुलदस् त्यात आहे. त्याबाबत प्रधानसेवक सातत्याने खोटे बोलत आहेत,  असे सांगत या प्रकाराचा निषेध ‘लुटारूंचा दिवस’ म्हणून भारि प-बहुजन महासंघ करणार आहे. नोटाबंदीमध्ये जीव गेलेल्यांना  श्रद्धांजली व निषेध कार्यक्रम प्रत्येक जिल्हा व तालुक्यात  घेण्याचे आवाहन पक्षाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले  आहे. नोटाबंदीसाठी जी कारणे देण्यात आली, त्यापैकी एक वगळता इ तर कारणांसाठी आरबीआयने २00५ च्या आधीच्या नोटा  बदलण्याचा निर्णय घेतला होता. नोटाबंदीचे सर्मथन करताना  प्रधानसेवकांनी काळा पैसा बाहेर काढणे, खोट्या नोटांना आळा  घालणे, दहशतवादी कारवाया रोखणे, अशी कारणे दिली होती.  त्यापैकी काहीही साध्य झाले नसल्याचेही अँड. आंबेडकर यांनी  म्हटले आहे. प्रधानसेवकांनी अमेरिका दौर्‍यात तेथील क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या  संघटनेबरोबर करारनामा करून त्यांना भारतात पूर्णपणे  मोकळीक देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे ते सातत्याने  प्लास्टिक मनी वापरण्याचे आवाहन करतात, त्याचे कारण  अमेरिकन कंपन्यांबरोबर झालेला करारनामा असल्याचेही अँड.  आंबेडकर यांनी म्हटले आहे. ३१ डिसेंबर २0१६ नंतर अनिवासी भारतीयांना नोटा बदलण्याचा  अधिकार ठेवला. भारतीयांना दुसर्‍या देशाचे चलन ठेवता येत  नाही. त्याप्रमाणे अनिवासी भारतीय दुसर्‍या देशाचे नागरिक अस तील, तर भारतीय चलन बाळगण्यावर र्मयादा आहेत. कोणता  कायदा, नियमानुसार अनिवासी भारतीयांना भारतीय चलन  बाळगता येते, याचे उत्तरही प्रधानसेवकांनी द्यावे, असे आव्हानही  त्यांनी दिल्याचे पत्रक पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस ज.वि. पवार,  सहजिल्हा प्रसिद्धिप्रमुख रणजित वाघ यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 

काँग्रेस पाळणार काळा दिवस नोटबंदीचा निर्णय हा देशाच्या आर्थिक विकासाला खिळ  बसविणारा ठरला असून या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस  बुधवार ८ नाव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळणार आहे.  स्थानिक स्वराज्य भवनातून काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते  मोर्चा काढणार असून मदनलाल धिंग्रा चौकात निर्दशने करणार  असल्याची माहिती महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी तसेच  जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी दिली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर