शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढती मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:42 IST

अकोला : प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्‍या शिक्षकांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढती मिळणार असल्याची चर्चा शिक्षण खात्यात सुरू आहे. शिक्षकांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढती देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. २९ डिसेंबरपासून अर्जसुद्धा स्वीकारले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाने मात्र कानावर हात ठेवले असून, याबाबत कोणतीही माहिती अद्यापपर्यंत शिक्षण विभागाकडे पोहोचली नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

ठळक मुद्देअनेक वर्षांपासून मागणी प्रलंबितशिक्षण विभाग मात्र अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्‍या शिक्षकांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढती मिळणार असल्याची चर्चा शिक्षण खात्यात सुरू आहे. शिक्षकांना शैक्षणिक पात्रतेनुसार बढती देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. २९ डिसेंबरपासून अर्जसुद्धा स्वीकारले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाने मात्र कानावर हात ठेवले असून, याबाबत कोणतीही माहिती अद्यापपर्यंत शिक्षण विभागाकडे पोहोचली नसल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्राथमिक शिक्षकांची बढती प्रक्रिया सुरू होणार असून, प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार बढती दिली जाणार आहे. त्यामुळे शेकडो सहायक शिक्षक हे शिक्षकासोबतच प्राध्यापकही बनणार आहेत. सद्यस्थितीत राज्यातील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पटसंख्या घसरत असल्याने शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्येसुद्धा शेकडो प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्राथमिक शिक्षकांच्या बढतीचा प्रश्न मार्गी लावण्याचा शासन विचार करीत  आहे. यामध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गात शिकविणारे शिक्षक जर पदवीधर असतील, तर त्यांना सहावी ते दहावीच्या वर्गात शिकविण्याची संधी बढतीच्या माध्यमातून मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच पदवीप्राप्त असलेले व सहावी ते दहावीच्या वर्गात विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक हे पात्रतेनुसार पदवीपूर्व कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू शकतील. तसेच प्राथमिक शिक्षकांना बढती मिळाली तर त्यांच्या वेतनामध्येसुद्धा वाढ होणार आहे. बढतीसाठी इच्छुक असणार्‍या शिक्षकांचे २९ डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार असून, १५ फेब्रुवारीपर्यंंत हे अर्ज स्वीकारले जातील, अशी चर्चा शिक्षकांमध्ये आहे. 

प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना बढती देण्याविषयीचा कोणताही निर्णय अद्यापपर्यंत शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला नाही आणि असा कोणताही निर्णय झाल्याचे ऐकिवात नाही; परंतु याबाबत आदेश आल्यावर त्याची अंमलबजावणी करू. -प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरTeacherशिक्षक