शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढला; १०० कोटींच्या प्रस्तावासाठी मनपात लगीनघाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:07 IST

शासनाने मंजूर केलेल्या १०० कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यासाठी सत्ताधाºयांनी लगीनघाई सुरू केली.

ठळक मुद्देनवीन प्रभागांचा विकास करण्यासाठी आ.रणधीर सावरकर यांनी शासनाकडे ११० कोटींचा विकास आराखडा सादर केला.काही लेटलतीफ नगरसेवकांमुळे प्रस्तावाला विलंब झाला.असंतोष धुमसत असल्याचे ध्यानात येताच सत्ताधारी भाजपाने १०० कोटींचे प्रस्ताव तातडीने शासनदरबारी सादर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

- आशिष गावंडे

अकोला: महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या दरम्यान हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागात मूलभूत सुविधांचा उडालेला बोजवारा व नगरसेवकांकडून होणारी टाळाटाळ पाहता सर्वसामान्यांमध्ये सत्ताधारी भाजपाप्रती असंतोष निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने मंजूर केलेल्या १०० कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यासाठी सत्ताधाºयांनी लगीनघाई सुरू केली असून, प्रशासनाने ६१० विकास कामांपैकी ७७ कामांचे प्रस्ताव अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे सादर केल्याची माहिती आहे.शहरालगतच्या २४ गावांचा महापालिकेच्या सोयी-सुविधांवर ताण पडत असण्यासोबतच निकषानुसार मनपा क्षेत्राची हद्दवाढ करण्यासाठी मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी शासनाकडे हद्दवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. या गावांमध्ये ले-आऊट नसल्यामुळे प्रशस्त रस्ते, नाल्या, सर्व्हिस लाइन, पथदिव्यांसह पाणी पुरवठ्याची समस्या कायम होती. ही बाब लक्षात घेता अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी हद्दवाढीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने १ सप्टेंबर २०१६ रोजी हद्दवाढीवर शिक्कामोर्तब करीत अधिसूचना जारी केली. हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागांचा विकास करण्यासाठी आ.रणधीर सावरकर यांनी शासनाकडे ११० कोटींचा विकास आराखडा सादर केला होता. त्यापैकी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटींचा आराखडा मंजूर करीत २० कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. मनपा प्रशासनाने संबंधित प्रभागातील नगरसेवकांना विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही लेटलतीफ नगरसेवकांमुळे प्रस्तावाला विलंब झाला. यादरम्यान, प्रभागात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असताना भाजपाचे नगरसेवक समस्यांकडे ढुंकूणही पाहत नसल्याचा आरोप नागरिकांमधून सुरू झाला. त्यात तथ्यही असल्याचे दिसून येते. त्याचा परिपाक म्हणून की काय, डाबकी रोडवरील प्रभाग क्रमांक ८ मधील संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केल्याचे समोर आले. नवीन प्रभागातील नागरिकांचा संयम सुटत चालला असून, असंतोष धुमसत असल्याचे ध्यानात येताच सत्ताधारी भाजपाने १०० कोटींचे प्रस्ताव तातडीने शासनदरबारी सादर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादBJPभाजपा