अकोला : जिल्हा परिषदेच्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त यंदाही टळला आहे. त्यामुळे शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण होणार नसून, पुरस्काराचे वितरण लांबणीवर पडले आहे.जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा परिषदमार्फत दरवर्षी जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण केले जाते. शिक्षक दिनी म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही वर्षांंपासून जिल्हा परिषदेमार्फत वितरित होणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शिक्षक दिनी न होता, ते लांबणीवर पडण्याचा प्रघात झाला आहे. जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावरून मागविण्यात आलेले शिक्षकांचे प्रस्ताव उशिरा प्राप्त झाले. या प्रस् तावांची तपासणी सध्या सुरू आहे. पुरस्कारासाठी शिक्षकांची शिफारस आणि मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे जि. प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रफुल्ल कचवे यांनी स्पष्ट केले आहे.
यंदाही टळला जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त
By admin | Updated: September 5, 2014 01:32 IST