शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सद्यस्थितीत परराज्यातील मजुरांना घरी जाण्याची परवानगी नाही - गृहमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 09:53 IST

सध्याच्या परिस्थितीत परराज्यातील या व्यक्तींना घरी जाण्याची परवानगी देता येणार नाही. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘लॉकडाउन’मध्ये अकोला जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील २ हजार ४८ मजुरांची जिल्ह्यातील २५ ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. आश्रित व्यक्तींना आपल्या गावात जायचे आहे; मात्र सध्याच्या परिस्थितीत परराज्यातील या व्यक्तींना घरी जाण्याची परवानगी देता येणार नाही. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.यावेळी कोरोना संकटाचा सामना करत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन समन्वयाने व सहकार्याने काम करावे असे आवाहन देशमुख यांनी केले.प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती आणि सुरु असलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली.

लोकप्रतिनिधींनी मांडल्या सूचना!केशरी शिधापत्रिकाधारकांना १ मेपासून सवलतीच्या दरात धान्याचे वाटप सुरु होणार आहे; मात्र तोपर्यंत वाट न पाहता २६ एप्रिल रोजी असणाºया अक्षय तृतीयेपूर्वी गरिबांना धान्याचे वाटप सुरू करण्याची सूचना आमदार गोवर्धन शर्मा यांनी मांडली. तसेच शेतकऱ्यांना माल वाहतुकीसाठी दिलासा देण्याची मागणी आमदार हरीश पिंपळे यांनी केली. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीही यावेळी सूचना मांडल्या .आमदार देशमुख यांच्याकडे भेटआढावा बैठकीनंतर ना.अनिल देशमुख यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी विजयराव देशमुख, गोपाल दातकर, सुनील धाबेकर, अनिरूद्ध देशमुख, दिलीप बोचे, बंडू देशमुख, राहुल कराळे, अमोल मिटकरी आदी उपस्थित होते. ना.देशमुख यांनी स्रेहभोजनानंतर यवतमाळकडे प्रयाण केले.सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाना.देशमुख यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आलेल्या कार्यकर्त्यांमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.आश्रित व्यक्तींमध्ये अस्वस्थतेची भावना -संजय धोत्रे‘लॉकडाउन’मध्ये अडकलेल्या परराज्यातील मजुरांची निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे; मात्र घरी केव्हा जाता येईल, यासंदर्भात परराज्यातील आश्रित व्यक्तींमध्ये थोडीफार अस्वस्थतेची भावना आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनामार्फत समन्वयाने काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाAnil Deshmukhअनिल देशमुख