वृक्ष लागवडीच्या पूर्वतयारीसाठी मनपाला मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 02:30 PM2019-05-07T14:30:24+5:302019-05-07T14:30:44+5:30

अकोला: महापालिकेच्या स्तरावर दरवर्षी ऐन पावसाळ््याच्या तोंडावर वृक्ष लागवडीचे नियोजन केले जाते. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याची लंगडी सबब प्रशासकीय यंत्रणेकडून समोर केली जाते.

For the preparation of tree plantation, the municipality could not find a Muhurta | वृक्ष लागवडीच्या पूर्वतयारीसाठी मनपाला मुहूर्त सापडेना

वृक्ष लागवडीच्या पूर्वतयारीसाठी मनपाला मुहूर्त सापडेना

Next

अकोला: महापालिकेच्या स्तरावर दरवर्षी ऐन पावसाळ््याच्या तोंडावर वृक्ष लागवडीचे नियोजन केले जाते. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याची लंगडी सबब प्रशासकीय यंत्रणेकडून समोर केली जाते. अर्थात कागदोपत्री वृक्ष लागवड दाखवून शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जातो. असे प्रकार लक्षात घेता यंदा वृक्ष लागवडीच्या पूर्वतयारीसाठी नगर विकास विभागाने महापालिके ला ३१ मार्चची मुदत दिली होती. सव्वा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही मनपा प्रशासनाने वृक्षलागवडीची पूर्वतयारी केली नसल्याचे चित्र समोर आले आहे.
महापालिका क्षेत्राचा तब्बल पाच पटीने विस्तार झाला असून, विकास कामांच्या आड येणाऱ्या वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याचे चित्र आहे. त्याचे परिणाम अकोलेकरांना उन्हाळ््यात भोगावे लागत आहेत. उन्हाची दाहकता कमी करून पर्यावरणाला वाचविण्यासाठी केवळ वृक्ष लागवड हाच पर्याय असल्यामुळे शासनाने सन २०१७ ते २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत संपूर्ण राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. वृक्षांची लागवड, संगोपन आणि देखरेख करण्यासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार केला. नेहमीप्रमाणे मे किंवा जून महिन्यांत वृक्ष लागवडीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागत असल्याची परिस्थिती होती. यामुळे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्णत्वास जात नसल्याचे चित्र समोर आले. ही बाब लक्षात घेता नगर विकास विभागाने यावर्षी ३१ मार्च पूर्वी वृक्ष लागवडीसाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. सव्वा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही मनपा प्रशासनाने वृक्ष लागवडीसाठी कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचे चित्र आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या जनजागृतीला सुरुवात केली नसल्याचे दिसत आहे.

यंदा २० हजार वृक्षांचे उद्दिष्ट
विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावतीच्या वतीने यंदा अकोला महापालिकेला २० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील तीन वर्षांपासून मनपाकडून शहरात ‘ग्रीन झोन’ची संकल्पना राबवली जात आहे. त्यामध्ये वृक्ष लागवडीचे प्रमाण समाधानकारक असल्याचे चित्र आहे. यावर्षी २० हजार वृक्षांचे रोपण नेमके कोणत्या ठिकाणी केले जाणार, याबद्दल संभ्रमाची स्थिती आहे.

भौगोलिक विस्तारामुळे मनपाला वाव
महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन भौगोलिक क्षेत्रात तब्बल पाच पटीने वाढ झाली आहे. नवीन प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात खुले भूखंड आहेत. संबंधित जागेवर वृक्ष लागवड करण्यासाठी महापालिका प्रशासनाला मोठा वाव असल्याचे दिसून येते.

खड्डे खोदले, देयक ठप्प
गतवर्षी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले. त्याचा कंत्राट मनपातील एका कर्मचाºयाने घेतला होता. मनपा निधीतून सदर कामाचे देयक अदा केले जाणार होते. आजपर्यंतही संबंधित कंत्राटदाराला त्याचे देयक मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदा खड्डे खोदण्याचे काम घेण्यासाठी कंत्राटदारांनी नकार दिल्याची माहिती आहे.

 

Web Title: For the preparation of tree plantation, the municipality could not find a Muhurta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.