शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण प्रांजलची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:59 PM

Akola News : हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू.

- संतोषकुमार गवईपातुर : तालुक्यातील तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकट या यूपीएससी परीक्षा पास झालेल्या २५ वर्षीय तरुणाची आठवडाभरापासून सुरू असलेली कोरोनाविरुद्धची झूंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री११:१५ मिनिटांनी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.प्रांजलचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न अधूरे राहिलेकोरोनामुळे फुफ्फुस बाधित झाल्यानंतर सामान्य कुटुंबातील आईवडिलांनी मुलाचा जीव वाचावा यासाठी नातेवाईकांच्या मदतीने 55 लाख रुपये जोडून उपचार करण्यासाठी एअर एम्बूलंस द्वारा सोमवारी हैदराबादच्या यशोदा हास्पिटलला हलवले होते. तेथे उपचाराला प्रतिसाद देत असताना शुक्रवारी प्रांजलचा मृत्यू झाला.पातुर तालुक्यातील तांदळी गावच्या प्रांजल ने जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि कठोर परिश्रमातून यूपीएससी ही परीक्षा पास केली; मात्र गत आठवड्यात प्रांजल ला कोरोनाने गाठले. अकोल्याच्या खाजगी इस्पितळात दाखल केल्यानंतर प्रांजल ची तब्येत अत्यंत गंभीर झाली त्यामुळे प्रांजल चे फुफ्फुस अतिशय नाजूक अवस्थेत होते जीवन मिळण्याची आशा धूसर होत असताना कृष्णा भाऊ अंधारे तथा आप्तस्वकीयांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून अकोल्याच्या डॉक्टर सतीश गुप्ता यांच्या मदतीने हैदराबादच्या माणसाच्या फुफ्फुस वर काम करणाऱ्या यशोदा हॉस्पिटल चा शोध घेतला आणि संपर्क साधला.तलाठी म्हणून नोकरी करणाऱ्या प्रभाकर नाकट आणि आई अनुराधा नाकट यांच्या जिल्हाधिकारी होणाऱ्या एकुलत्या एक प्रांजलच्या उपचारासाठी सत्तावीस लाख रुपये जमा करण्याचं आवाहन होतं अशा परिस्थितीत नातेवाईक यांनी साथ दिली आणि हैदराबाद ची डॉक्टरांची चमू सोमवारी मध्यरात्री दोन वाजता अकोल्यात पोहोचली. त्यांनी ओझोन इस्पितळात तेवढयाच रात्री उपचार सुरु केले आणि प्रांजल ला धोक्याबाहेर काढण्यात आणि तब्येत स्थिर करण्यात यश आले होते. निष्णांत डॉक्टरांच्या चमूने पुढील उपचारासाठी हैदराबादला प्रांजल ला हलविण्याचे सुचवल.यावेळी हेमलाता अंधारे आणि कृष्णा अंधारे यांनी परिवाराला बळ दिले व सोमवारी सकाळी नऊ वाजता अकोल्याच्या विमानतळावर प्रांजल ला घेण्यासाठी ॲम्बुलन्स दाखल झाली होती. सर्वप्रकारची पूर्वतयारी करून हैदराबादच्या पाच डॉक्टरांसह ॲम्बुलन्स द्वारे अवघ्या एका तासामध्ये हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं तेथे डॉ. जिंदाल आणि चमुने प्रांजल वर उपचार केले. बेशुद्ध असलेल्या प्रांजलने बुधवारी डोळे उघडले होते. बाबा आणि दोन्ही काकासोबत प्रांजल ने संवाद साधला.त्याच्या काकांनी लवकरच बरं होउन घरी जाऊ असं सांगितलं.त्याची तब्येत धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु शुक्रवारी दुपारनंतर गुंतागुंत वाढली आणि यातच प्रांजलचा मृत्यू झाला. एअर एम्बूलंस द्वारा अकोल्यातुन हैदराबाद ला परिस्थिती नसताना एकुलत्या एक प्रांजल चे प्राण वाचावे.यासाठी आई अनुराधा नाकट वडील प्रभाकर नाकट आणि तेवढ्याच आर्थिक, आणि मानसिक बळ नातेवाईक यांनी दिले होते. हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल च्या एम्बूलंस ने शनिवारी प्रांजल चे पार्थिव अकोल्यात आणण्यात आले.मोहता मिल च्या स्मशानभूमीत त्यांच्या वर मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले
टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या