कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:20 PM2017-12-25T16:20:55+5:302017-12-25T16:23:23+5:30

Pran survived a fox in a dry well |  कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे वाचविले प्राण

 कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे वाचविले प्राण

Next
ठळक मुद्देपातुर तालुक्यातील हिंगणा येथील घटना.वनविभागाच्या कर्मचाºयांनी दोरांच्या सहाय्याने काढले कोल्ह्याला बाहेर.बाहेर पडताच कोल्ह्याने जंगलात धुम ठोकली.

दिग्रस बु. : (अकोला) : पाण्याच्या शोधार्थ कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला आलेगाव वनविभागाच्या कर्मचाºयांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढून त्याला जीवदान दिले. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्या अंतर्गत येणाºया हिंगणा येथील शेतशिवारात सोमवारी  दुपारी पाण्याच्या शोधात आलेला एक कोल्हा  कोरड्या विहिरीत पडला. पंजााबराव उजाडे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याने जीवाच्या आकांताने ओरडणे सुरु केल्यावर काही ग्रामस्थांना त्याचा आवाज ऐकू आला. ही वार्ता पसरताच गावकºयांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यांनी कोल्ह्याला विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी आलेगाव वनविभागाचे कर्मचाºयांना पाचारण केले. वनपरिक्षेत्र अधिकारी देशमुख, कर्मचारी अविनाश घुगे, गजानन काढोले, प्राणीमित्र मुन्ना शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन कोल्ह्याला दोरांच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढले. हा प्रकार दोन-अडीच तास सुरु होता. बाहेर पडताच कोल्ह्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. यावेळी वैभव उजाडे, नितीन सोनोने, गणेश उजाडे, प्रजवल  बरडे, विरु इंगळे, आकाश आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले.
 

Web Title: Pran survived a fox in a dry well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.