शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रभात’परिवाराने उचलले बालसुरक्षेसाठी पाऊल ; ‘आम्ही बालसंरक्षक’ पोस्टरचे विमोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 18:53 IST

 अकोला : बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये बालसुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब झाली असून, यावर सामाजिक भाण निर्माण करण्याच्या हेतूने प्रभात किड्स स्कूल  येथे ‘बालकांची सुरक्षितता’ या विषयावर कार्यशाळा   ३१ मार्च रोजी संपन्न झाली

ठळक मुद्दे‘बालकांची सुरक्षितता’ या विषयावर कार्यशाळा   ३१ मार्च रोजी संपन्न झाली. यावेळी ‘प्रभात’ परिवारातील सर्व सदस्यांनी ‘आम्ही बालसंरक्षक’ अशी शपथ घेतली.  समाजात कुठेही बालक शोषणास बळी पडत असेल तर धावून जाण्याचा निर्धार कर्मचाठयांच्या वतीने डॉ.प्रदीप अवचार यांनी यावेळी व्यक्त केला. 

 अकोला : बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये बालसुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब झाली असून, यावर सामाजिक भाण निर्माण करण्याच्या हेतूने प्रभात किड्स स्कूल  येथे ‘बालकांची सुरक्षितता’ या विषयावर कार्यशाळा   ३१ मार्च रोजी संपन्न झाली. यावेळी ‘प्रभात’ परिवारातील सर्व सदस्यांनी ‘आम्ही बालसंरक्षक’ अशी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘प्रभात’चे संचालक डॉ. गजानन नारे होते. समुपदेशक डॉ. प्रदीप अवचार यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ‘प्रभात’च्या संचालिका सौ. वंदना नारे, व्यवस्थापक अभिजित जोशी, निमिष तिवारी, उपप्राचार्य वृषाली वाघमारे, अर्चना बेलसरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने प्रभात किड्स स्कुल येथे सुरवातीपासूनच दक्ष आहे. समाजात कुठेही बालक शोषणास बळी पडत असेल तर धावून जाण्याचा निर्धार कर्मचाठयांच्या वतीने डॉ.प्रदीप अवचार यांनी यावेळी व्यक्त केला. बालहक्क व सुरक्षेसाठी भारतीय संविधानात विविध तरतूदी केल्या आहेत. तसेच या नियमांच्या अमंलबजावणीसाठी विविध शासकीय संस्था कार्यरत असल्याचे सांगून, समाजातील प्रत्येक घटकाने बालसुरक्षिततेसाठी पुढे येऊन कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ.गजानन नारे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक हिताच्या दृष्टिने बालसुरक्षेसाठी सैदव तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ.गजानन नारे यांच्या हस्ते ‘आम्ही बालसंरक्षक’ या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. तसेच प्रभात किड्स स्कूलच्या चालक, वाहक व तार्इंसह इतर सदस्यांना ‘आम्ही बालसंरक्षक’ हे बोधचिन्ह असलेले बॅचेस लावण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे व कर्मचाठयांनी विशेष प्रयत्न घेतले. 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा