अकोला - हैदराबाद येथे युनिक क्रिएशनतर्फे आयोजित सेव्हन्थ ऑल इंडिया फिडे रेटिंग चेस टुर्नामेंट बिलो १८०० या स्पर्धेत अकोल्यातील प्रभात किड्स कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी संस्कृती वानखडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. वयोगटानुसार आयोजित या बुद्धिबळ स्पर्धेत संस्कृती संघदास वानखडे हिने आठ वर्षाआतील वयोगटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेमध्ये संस्कृतीने ९ राऊंडपैकी पाच राऊंड जिंकून महाराष्ट्रातील १ हजार ४८९ व बंगालमधील १ हजार ६३७ रेटिंगधारक स्पर्धकांना नमविले. त्यामुळे संस्कृतीच्या १ हजार २८१ या रेटिंगमध्ये ३५ गुणांनी वाढ होणार आहे. संस्कृतीने प्रथम क्रमांक पटकाविल्यानंतर या स्पर्धेचे बक्षीस वितरण साऊथ इंडियन सुपरस्टार टी. गोपीचंद यांच्या हस्ते तिला ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्कृती वानखडेला प्रभात किड्सचे संचालक गजानन नारे, प्राचार्या पटोकार, सुधीर दलाल, राहुल भारसाकळे, जितेंद्र अग्रवाल यांच्यासह आई-वडिलांनी मार्गदर्शन केले.
प्रभात किड्सची संस्कृती बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम
By admin | Updated: May 14, 2014 23:20 IST