अकोला, दि. ३0- अकोला येथील वाशिम बायपासवरील रहिवासी आनंद गवई आणि माना येथील रहिवासी संजय खंडारे या दोन शहीद जवानांचे पार्थिव ३१ जानेवारी रोजी अकोल्यात येणार असल्याने सकल मराठा समाजाने आयोजित केलेले चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने शहीद वीर खंडारे आणि गवई यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या दोन्ही पार्थिवांच्या अंतिम संस्कारासाठी समाजाच्या नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन समाजाने केले आहे. आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने डॉ. अभय पाटील, युवराज गावंडे, कृष्णा अंधारे, विनायकराव पवार, डॉ. रणजित कोरडे, पंकज जायले, राजदत्त मानकर, निखिल ठाकरे यांनी दिली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे चक्काजाम आंदोलन स्थगित
By admin | Updated: January 31, 2017 02:42 IST