शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ई-कॉमर्सच्या पॉलिसी निश्चितीपर्यंत पोर्टल बंद करावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:06 IST

अकोला : ई-कॉमर्सच्या पॉलिसी निश्चितीपर्यंत पोर्टल बंद करावे, ई-कॉमर्सची पॉलिसी मार्च महिन्याच्या आत तयार करावी, सोबतच ई-कॉमर्सच्या माध्यमातून होणाऱ्या कंपनीच्या व्यवसायाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन आॅफ आल इंडिया ट्रेडर्स (कॅट)च्या पदाधिकाऱ्यां नी सरकारकडे केली आहे.

- संजय खांडेकरअकोला : ई-कॉमर्सच्या पॉलिसी निश्चितीपर्यंत पोर्टल बंद करावे, ई-कॉमर्सची पॉलिसी मार्च महिन्याच्या आत तयार करावी, सोबतच ई-कॉमर्सच्या माध्यमातून होणाऱ्या कंपनीच्या व्यवसायाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन आॅफ आल इंडिया ट्रेडर्स (कॅट)च्या पदाधिकाऱ्यां नी सरकारकडे केली आहे.ई-कॉमर्सच्या माध्यमातून देशातील लघू उद्योजकांना संपविण्याचा कट सुरू आहे असा आरोप करून एफडीआय पॉलिसीला विरोध करण्यासाठी ‘कॅट’ने देशभरात निषेध यात्रा, मोर्चे आणि अधिवेशन घेतले. त्यानंतर सरकारने आता ई-कॉमर्सच्या नियमावलीवर बोलण्यास सहमती दर्शविली आहे. मोठ्या कंपन्यांच्या आॅनलाइन कारभारावर टीका करीत ‘कॅट’ने या सर्व कंपनीच्या व्यवसायाची तपासणी करणे गरजेचे असल्याची मागणी केली आहे. सरकारच्या एफडीआय पॉलिसीच्या विरोधात ‘कॅट’ने मोठे अभियान छेडले असून, ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांच्या पुढाकारात आता ई-कॉमर्सच्या नियमावली ठरविण्याची मागणी जोर धरत आहे. मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांना लुटल्याचा आरोपही ‘कॅट’ने केला आहे. कोणत्याही परिस्थितीत रिटेल व्यापार कंपन्यांवर मोठ्या कंपनीचा कब्जा होऊ देणार नाही, असा इशाराही ‘कॅट’च्या पदाधिकाºयांनी निवेदनाच्या माध्यमातून सरकारला दिला आहे.ई-कॉमर्सच्या माध्यमातून मागील वर्षात मोठ्या कंपन्यांनी केलेल्या व्यापारातील आर्थिक उलाढालीच्या व्यवहाराची तपासणी करावी, असेही ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील चेंबर्स आणि देशातील, विदेशातील काही उद्योजक मिळून देशातील व्यापार खिळखिळा करीत आहे. वास्तविक बाजार आणि ई-कॉमर्सच्या बाजारात एकरूपता आणण्यासाठी सरकारने सुदृढ स्पर्धा आणावी, यासाठी रिटेलर व्यापारी आणि मोठ्या कंपनीच्या व्यापारासाठी एकच कायदा असावा, यासाठी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी, ३१ मार्च २०१९ पर्यंत ही प्रणाली पूर्ण करावी, जोपर्यंत ई-कॉमर्सची पॉलिसी अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत ई-कॉमर्सचे पोर्टल बंद करण्यात यावे.-जर मागण्या पूर्ण होत नसतील, तर ‘कॅट’चे आंदोलन आधीच निश्चित आहे. ते अधिक तीव्र होईल. याचे परिणाम आगामी निवडणुकीवर दिसून येणार आहेत.-अशोक डालमिला,सचिव, ‘कॅट’.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय