शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय चर्चा :  सुबोध सावजींनी घेतली आंबेडकरांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:20 IST

अकोला- काँग्रेस महाआघाडीमध्ये भारिप-बमसंचा सहभाग हा एमआयएममुळे अडचणीचा ठरत असल्याच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसचे माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते सुबोध सावजी यांनी मंगळवारी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

अकोला- काँग्रेस महाआघाडीमध्ये भारिप-बमसंचा सहभाग हा एमआयएममुळे अडचणीचा ठरत असल्याच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसचे माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते सुबोध सावजी यांनी मंगळवारी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीतील तपशील उघड करण्याबाबत सावजी यांनी मौन बाळगले असून, या दोन नेत्यांमधील चर्चा ही महाआघाडीमधील अ‍ॅड.आंबेडकरांचा समावेश की वंचित बहुजन आघाडीसाठी बुलडाण्यात पर्यायाचा शोध या दृष्टीने होती का, याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.माजी राज्यमंत्री व बुलडाण्यातील ज्येष्ठ नेते असलेले सुबोध सावजी हे नेहमीच आक्रमक व चर्चेत राहणारी भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांनी नळ योजनांमधील भ्रष्टाचार, या मुद्दावर बुलडाण्यात रान उठवले आहे. या योजनांच्या चौकशीसाठी १२ दिवसांचे उपोषणही केले होते. त्यांचा पुत्र शैलेष सावजी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला असला तरी सुबोध सावजी यांचा पक्षात पुन: प्रवेश झालेला नाही, सध्या त्यांची वाटचाल लोकसभा निवडणूक लढविण्याकडे असल्याने अ‍ॅड.आंबेडकर यांच्यासोबत त्यांनी घेतलेली राजकीय भेट नेमकी कशासाठी, याची चर्चा सुरू झाली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भारिप-बमसं सर्वच लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांचा शोध घेत असून, त्या शोधाचाच एक भाग म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. दरम्यान, सुबोध सावजी यांच्यासोबत संपर्क साधला असता, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सर्वच राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले; मात्र तपशील देण्यास नकार दिला. योग्य वेळी माहिती देऊ, असे ‘लोकमत’ शी बोलताना त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSubodh Savjiसुबोध सावजीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर