शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

 पॉली हाउस उभारणीकडे कल; शेतकऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 14:30 IST

अकोला : जिल्ह्यातील शेतकरी आता हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळत असून, शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान कें द्राच्यावतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अकोला : जिल्ह्यातील शेतकरी आता हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळत असून, शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान कें द्राच्यावतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.या तंत्रज्ञानामुळे तापमान, आर्द्र्रता व पाणी हे सर्व घटक कृत्रिमरीत्या नियंत्रित करू न पिकांच्या वाढीसाठी असलेले आवश्यक घटक पिकांच्या अवस्थेनुसार कमी-अधिक प्रमाणात पुरविले जातात. या नियंत्रित वातावरणात सूर्यप्रकाश, कार्बनडॉय आॅक्साइड इत्यादी घटकांचा वनस्पतीच्या वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर करू न मोकळ्या वातावरणापेक्षाही अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नियंत्रित वातावरणासाठी प्रामुख्याने पॉली हाउससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आता आवश्यक झाल्याने पारंपरिक शेतीसोबतचशेतकरी आता या तंत्रज्ञानाकडे वळला आहे.पॉली हाउसमुळे कमी जागेत व कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेता येत असून, मजुरांना वर्षभर रोजगार उपलब्ध करू न देता येतो. विशेष म्हणजे, गुंतवलेल्या रकमेतून खात्रीशीर उत्पन्न मिळते. गारपीट, अवकाळी पाऊस, वादळवारा, दव, धुके, प्रखर तापमान या नैसर्गिक घटकांपासून पिकांचे नुकसान टाळले जाते. रोग किडींच्या प्रादुर्भावापासून पिकांचे संरक्षण करू न वेळेवर उपाययोजना करता येतात. या तंत्रज्ञानाचा वापर करू न उत्पन्नात दुप्पट ते चौपट वाढ होत असल्याने या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे अनुदान दिले जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना हरितगृह बांधणी, लागवड व देखभाल या विषयासह हरितगृहाचे प्रकार व फायदे, अर्थशास्त्र, फूलशेती, भाजीपाला लागवड तसेच हरितगृहातील पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन आदींचे तंत्रज्ञान प्रशिक्षणाद्वारे समजावून सांगितले जात असून, आता यावर अधिक लक्ष दिले जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती