लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी अकोला पोलीस दलाने एक पाऊल पुढे टाकत सिटिझन पोर्टलचे उद्घाटन गुरुवारी केले. या माध्यमातून थेट ‘ई-कम्प्लेंट’ करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर व अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या पुढाकाराने कार्यान्वित करण्यात आलेल्या या सुविधा केंद्राचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले आहे. सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध असणार्या महाराष्ट्र पोलीस दलाची वाटचाल आधुनिकतेकडे होत आहे. वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसवून कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पोलीस दलावर आहे; मात्र अपुरे मनुष्यबळ, तक्रारींची वाढती संख्या आणि त्याचा तपास करून दोषींना शिक्षा होईपर्यंत करावा लागणार्या पाठपुराव्यामुळे पोलीस कर्मचार्यांना तारेवरची कसरतच करावी लागते. त्यातही बर्याच वेळा फिर्यादींना तक्रारी, तपासाची माहिती घेण्यासाठी वारंवार पोलीस स्टेशनच्या माराव्या लागणार्या चकरा आणि त्यातूनच त्यांची होणारी कुचंबणा सोडविण्यासाठी अकोला पोलीस दलाने ‘ऑनलाइन तक्रार’ करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राकेश कलासागर व अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी पोलीस दलाला आधुनिकतेची जोड देत लोकहिताचे अनेक उपक्रम राबविले आहेत. त्याचाच भाग म्हणून ‘ई-कम्लेंट’ उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हय़ातील नागरिकांच्या तक्रारींचे पोलीस प्रशासनाकडून निराकरण होऊन दोषींवर तत्परतेने कारवाई होण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रार नोंदविण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र ‘ई-कम्लेंट कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे आज जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रियंका शेलार, पोलीस उपअधीक्षक अरुण गावित, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील, सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रामेश्वर चव्हाण यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांच्या सुविधेसाठी पोलिसांचेही सिटिझन पोर्टल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:21 IST
अकोला : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी अकोला पोलीस दलाने एक पाऊल पुढे टाकत सिटिझन पोर्टलचे उद्घाटन गुरुवारी केले. या माध्यमातून थेट ‘ई-कम्प्लेंट’ करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर व अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या पुढाकाराने कार्यान्वित करण्यात आलेल्या या सुविधा केंद्राचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी पोलिसांचेही सिटिझन पोर्टल
ठळक मुद्देसिटिझन पोर्टलच्या माध्यमातून करता येणार ई-तक्रार