शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

पोलीस प्रशिक्षण दीक्षांत सोहळा: ५८१ प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 15:11 IST

अकोला : अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचा ६२ व्या सत्राचा दिशांत संचलन सोहळा गुरुवार, ६ जून रोजी उत्साहात पार पडला.

अकोला : अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचा ६२ व्या सत्राचा दिशांत संचलन सोहळा गुरुवार, ६ जून रोजी उत्साहात पार पडला. सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी म्हणून अजित सदाशिव डफळ यांचा गौरव करण्यात आला. या सत्रात प्रशिक्षण केंद्रातील ५८१ प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायांनी प्रशिक्षण पूर्ण केले.दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांची उपस्थिती होती. सोहळ्याला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी परेड कमांडर, प्रशिक्षणार्थी अमोल बोधे व सेकंड इन परेड कमांडर प्रशिक्षणार्थी प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वात कवायत संचलन सादर करण्यात आले. यासोबतच पोलीस प्रशिक्षणार्थींनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रशांत वाघुंडे यांनी प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेपासून २५ हजार ३३९ प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केल्याची माहिती यावेळी दिली. सत्र क्रमांक ६२ मध्ये प्रशिक्षणार्थींच्या परीक्षेचा अंतिम निकाल ९६ टक्के लागल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य नाफडे, राखीव पोलीस निरीक्षक इंगळे, पोलीस निरीक्षक शालिनी नाईक यांच्यासह प्रशिक्षण केंद्रातील सर्व आंतरवर्ग व बाह्यवर्ग अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार केंद्राचे उपप्राचार्य विजय नाफडे यांनी मानले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस