अकोला, दि. १२- सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वृंदावन नगर येथून तीन वर्षांंपूर्वी कार चोरणार्या चोरट्यांना वर्धा जिल्हय़ातून अटक केल्यानं तर त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन्ही चोरट्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.वृंदावन नगर येथील रहिवासी इंद्रनील देशमुख यांची एमएच ३0 एए ९८९ क्रमांकाची कार २0१४ मध्ये चोरीस गेली होती. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. यामध्ये सदर कार वर्धा जिल्हय़ातील हिंगणघाट येथील रहिवासी रघ्या ऊर्फ सुरज रामभाऊ वखारकर आणि देवडी येथील रहिवासी प्रफुल्ल ऊर्फ बबलू गजानन गांगेकर या दोघांनी चोरल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी वर्धा येथून सदर दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून कार जप्त करण्यात आली आहे. दोन्ही चोरट्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आरोपींच्या वतीने अँड. केशव एच. गिरी, वैशाली गिरी भारती यांनी कामकाज पाहिले.
कार चोरट्यांना पोलीस कोठडी
By admin | Updated: March 13, 2017 02:37 IST