शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कीटकनाशक विक्री करणाऱ्यांना पोलिसांचे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 16:19 IST

अकोल्यातील महेश एंटरप्रायजेस यांच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी हे आरोपी अद्यापही मोकाट असल्याचे वास्तव आहे.

अकोला : बनावट कीटकनाशकांची संगनमताने विक्री करणाºया उत्पादक क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन कंपनी, नागपूर येथील वितरक गोविंद एंटरप्रायजेस, अकोल्यातील महेश एंटरप्रायजेस यांच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी हे आरोपी अद्यापही मोकाट असल्याचे वास्तव आहे. आरोपींमध्ये बडे मासे असल्याने रामदास पेठ पोलिसांकडून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्नही होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे.क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन कंपनीने कृषी विभागाकडे त्यांच्याच उत्पादनांच्या नावाने बनावट कीटकनाशकाची कृषी सेवा केंद्राद्वारे विक्री सुरू असल्याची तक्रार केली होती. अकोला शहरातील महेश एंटरप्रायजेसमधून कंपनीच्या बनावट उत्पादनांची ठोकमध्ये विक्री सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद होते. त्यानुसार मिसाइल व बाव्हिस्टीन या बनावट उत्पादनांची कृषी विभागाने चौकशी केल्यानंतर बनावट कीटकनाशकांची विक्री सुरू असल्याचा अहवाल रामदास पेठ पोलीस ठाण्यात देण्यात आला. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला, मात्र आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. रामदास पेठ पोलिसांकडून या आरोपींना अभय देण्यात येत असल्याची चर्चा कृषी विभागात सुरु आहे. महेश एंटरप्रायजेससह नागपुरातील गोविंद एंटरप्रायजेसच्या संचालकांना बेड्या ठोकण्यासाठी रामदास पेठ पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याने या आरोपींनी आता अटकपूर्व जामिनासाठी धावपळ सुरू केली आहे.कृषी विभागाची भूमिका संशयास्पदबनावट कीटकनाशक तयार करून विक्री सुरू असल्याची तक्रार सर्वात आधी क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन कंपनीनेच केली होती. एवढेच नव्हे तर कृषी विभागाने कंपनीने उत्पादित केलेल्या बॅच क्रमांकातील साठ्यातून घेतलेले नमुने प्रयोगशाळेच्या तपासणीला पाठविले असता ते प्रमाणित आढळून आले. मात्र, त्यानंतरही कृषी विभागाच्या अधिकाºयांनी कंपनीलाच आरोपी केले आहे. यावरून या प्रकरणात कृषी विभागाची भूमिकाही संशयास्पद असून, हे प्रकरण गुंतागुंतीचे करून शेतकºयांची फसवणूक करणाºयांना कृषी विभाग पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.या कृषी सेवा केंद्राद्वारेही विकले कीटकनाशककीटकनाशकाचे उत्पादन क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनने केल्यानंतर नागपुरातील गोविंद एंटरप्रायजेस, महेश एंटरप्रायजेस यांनी बोगस कीटकनाशक अकोल्यासह यवतमाळ, वाशिम व पुसदमधील काही कृषी सेवा केंद्राद्वारे विक्री केला आहे. यामध्ये अकोल्यातील न्यू बजरंग कृषी सेवा केंद्र, आनंद ट्रेडर्स बार्शीटाकळी, संजय कृषी सेवा केंद्र, किसान कृषी सेवा केंद्र, शीतल कृषी सेवा केंद्र बार्शीटाकळी, शिल्पा कृषी भांडार हातगाव यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशन