शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव मंजुतील सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:39 IST

भारत विरूद्ध बांगलादेशच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असताना बोरगाव मंजु येथील सट्टा अड्ड्यावर स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून तीन आरोपींना अटक केली.

ठळक मुद्दे कैलास सिताराम अग्रवाल याच्या निवासस्थानी सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर यांना मिळाली.त्यानंतर त्यांच्या पथकाने बोरगाव मंजु येथील कैलास अग्रवाल याच्या निवासस्थानी छापा टाकला. त्यांनी हा गौरखधंदा सिंधी कॅम्पमधील रहिवासी गीरीष गुरुबानी याच्या मालकीचा असल्याचे सांगीतले.

अकोला : आशिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात म्हणजेच फायनलमध्ये भारत विरूद्ध बांगलादेशच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असताना बोरगाव मंजु येथील सट्टा अड्ड्यावर स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एका कारसह सात लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बोरगाव मंजुतील रहिवासी कैलास सिताराम अग्रवाल याच्या निवासस्थानी भारत बांग्लादेश सामन्यावर मोठया प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या पथकाने बोरगाव मंजु येथील कैलास अग्रवाल याच्या निवासस्थानी छापा टाकला. या ठिकाणी अकोल्यातील सिंधी कॅम्पमधील रहिवासी दिनेश घनशामदास पारवाणी, गीरीष विश्वनाथ गुप्ता रा. रणपीसे नगर जागृती विद्यालयाजवळ अकोला या तिघांना ताब्यात घेतले. या तीनही सट्टा माफीयांची कसुन चौकशी केली असता त्यांनी हा गौरखधंदा सिंधी कॅम्पमधील रहिवासी गीरीष गुरुबानी याच्या मालकीचा असल्याचे सांगीतले. पोलिसांना त्याचा शोध सुरु केला आहे.या सट्टा अड्डयावरुन पोलिसांनी एक स्वीफ्ट कार, दोन रिमोट, सेट अप बॉक्स, सहा मोबाईल व एक एलजी कंपनीचा टीव्ही असा एकून सात लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कैलास सिताराम अग्रवाल, दिनेश घनशामदास पारवाणी, गीरीष विश्वनाथ गुप्ता व मुख्य सुत्रधार गीरीष गुरुबानी या चार जनांविरुध्द बोरगाव मंजु पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रणजितसिंह ठाकूर, दिनकर बुंदे, गणेश पांडे, आशीष ठाकूर, अश्वीन शिरसाट, फीरोज खान, गीता अवचार व संजय निखाडे यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी