शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडळांना पोलीस परवानगी आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 16:26 IST

अकोला : श्री गणेश उत्सवाला १३ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून, या उत्सवात सर्वात महत्त्वाची असलेल्या पोलिसांच्या परवानगीसाठी आता हेलपाटे वाचणार असून, ही परवानगी आॅनलाइन प्रक्रियेद्वारे मिळणार आहे.

ठळक मुद्दे नागरिकांच्या सोयीसाठी सिटिझन पोर्टल ही सेवा सुरू करण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या सदस्यांच्या सोयीकरिता गणेशोत्सव परवागनी अर्ज आता आॅनलाइन करण्यात आला आहे.

अकोला : श्री गणेश उत्सवाला १३ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून, या उत्सवात सर्वात महत्त्वाची असलेल्या पोलिसांच्या परवानगीसाठी आता हेलपाटे वाचणार असून, ही परवानगी आॅनलाइन प्रक्रियेद्वारे मिळणार आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गणेश मंडळांना विविध यंत्रणेच्या परवानग्या घ्यावा लागतात.माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने नागरिकांनी मोबाइल व इंटरनेट वापर करताना नागरिकांच्या सोयीसाठी सिटिझन पोर्टल ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आॅनलाइन तक्रार देणे, प्रथम खबर पाहणे, हरविलेल्या व्यक्तीची माहिती इत्यादी अनेक माहिती नागरिकांसाठी सिटिझन पोर्टलमध्ये उपलब्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून यामध्ये गणेश मंडळांच्या सदस्यांच्या सोयीकरिता गणेशोत्सव परवागनी अर्ज आता आॅनलाइन करण्यात आला आहे. गणेश मंडळांच्या सदस्यांनी या संकेतस्थळावर आपले युझरनेम आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर ते आपल्या खात्यामधून गणेशोत्सव पोलीस परवानगीकरिता अर्ज करून शकतील. अर्जाची एक प्रत व इतर परवानगी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी लागणार आहे. त्यांना परवानगी मिळाल्याचा संदेश मोबाइलवर मिळणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.महापालिकेची एक खिडकी योजना!शासन निर्णयानुसार, महापालिका प्रशासन गणेश भक्तांसाठी महापालिकेमध्ये एक खिडकी कार्यान्वित करणार आहे. या खिडकी योजनेच्या माध्यमातून गणेशभक्त व गणेश मंडळांना विविध परवानगी देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने सोमवारी खाते प्रमुखांची बैठक घेण्यात येऊन सूचना देण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुविधेसाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले आहे. सिटिझन पोर्टल हे नागरिकांना एका क्लिकवर माहिती देण्याचे साधन आहे. त्यामुळे याच पोर्टलवर गणेश मंडळांसाठी यंदा प्रथमच पोलीस दलाने पोलीस परवानगी अर्ज आॅनलाइन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गणेशभक्त तथा गणेश मंडळांसाठी ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाGanpati Festivalगणेशोत्सवPoliceपोलिस