शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारांवर पोलिसांची मेहेरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 12:39 IST

अकोला: जिल्ह्यातील अवैध सावकारांच्या विरुद्ध झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली असून, तब्बल शेकडो खरेदी-विक्री व इसाराचे अवैध दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.

- सचिन राऊत

अकोला: जिल्ह्यातील अवैध सावकारांच्या विरुद्ध झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली असून, तब्बल शेकडो खरेदी-विक्री व इसाराचे अवैध दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये श्याम लोहिया या अवैध सावकाराच्या घरातूनही मोठे दस्तावेज जप्त करण्यात आले. लोहियाने घरात येऊन दोनदा धाकदपट केल्यामुळेच तुकाराम जाधव यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने केली; मात्र पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केल्याने या अवैध सावकारांवर पोलिसांची मेहेरनजर असल्याचे स्पष्ट होत आहे.तुकाराम मारोती जाधव यांना औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी रामदासपेठेतील रहिवासी अवैध सावकार शामसुंदर लोहिया यांच्याकडून ३ लाख रुपयांची रक्कम व्याजाने घेतली होती. तर यामधील १ लाख रुपये लोहिया व विठ्ठल टाले या दोघांनी व्याजापोटी जागेवरच परत घेतले. या मोबदल्यात श्याम लोहिया याने तुकाराम जाधव यांचे रिधोरा शेतशिवारातील १ हेक्टर ५३ आर शेतीचा इसार केला. जाधव यांनी इसार करण्यास नकार दिला असता केवळ सुरक्षेसाठी हा इसार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. शंभर रुपयांच्या बॉण्डवर ३ लाखांऐवजी १० लाख रुपयांमध्ये इसाराचा व्यवहार झाल्याचे नमूद करीत जाधव या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. त्यानंतर या प्रकरणात जिल्हा उपनिबंधकांकडे अवैध सावकारीच्या तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली; मात्र त्यानंतर १३ जुलै २०१८ रोजी श्याम लोहिया व त्याच्या साथीदारांनी तुकाराम जाधव यांच्या निवासस्थानी धुडगूस घातला. या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली; मात्र पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली. १३ नोव्हेंबर रोजी असाच हैदोस घातल्याने १४ नोव्हेंबरच्या पहाटे त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला; मात्र पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही. शारदा जाधव यांनी या प्रकरणाची तक्रार व अवैध सावकारीची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली. त्याच दिवशी जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाने श्याम लोहिया याच्या निवासस्थानी छापेमारी करीत अवैध सावकारी व्यवहाराचे ६७ खरेदी खत, ५ मुखत्यारपत्र व ५०० आणि १०० रुपयांचे कोरे बॉण्ड, एक समझोता लेख, एक इसार पावती, ४ ताबा पावती, एक टोकन पावती व २८ सातबारा व फेरफार असा मोठा साठाच आढळल्याने तुकाराम जाधव व त्यांच्या पत्नीच्या तक्रारी वास्तव असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस