शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीस बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 14:23 IST

या मारहाणीत त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून तीच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अकोला -मुर्तीजापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस कर्मचारी सतीष लक्ष्मनराव अघडते याने त्याच्या पत्नीस बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या मारहाणीत त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून तीच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सदर पोलिस कर्मचाºयाविरुध्द मुर्तीजापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुर्तीजापूर शहरातील ग्रामसेवक कॉलनीत रहिवासी असलेला सतीष लक्ष्मनराव अघडते याने त्याची पत्नी जयश्री हीला पोलिसांच्या काठीने बेदम मारहाण केली. तीच्या पाठीवर व पायावर काठीने मारहाण केल्यामुळे जयश्री यांना प्रचंड जखमा झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिस कर्मचारी सतीष अघडते याने एखाद्या नराधमाप्रमाणे काठी तुटेपर्यंत पत्नीला मारहाण केल्याची माहिती मुर्तीजापूर शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जयश्री यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सतीष अघडते याने जयश्री यांच्या आई-वडीलांनाही अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिस घरी पोहोचल्याची माहिती मिळताच सतीष अघडते फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी जयश्री यांनी मुर्तीजापूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सतीष अघडते याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८, ३२४, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अघडतेवर निलंबनाची टांगती तलवारसतीष अघडते याने पत्नीला बेदम मारहाण केल्याची माहिती वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी अघडतेच्या निलंबनाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देष दिले. तसेच त्याला तातडीने निलंबीत करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अघडते याला येत्या दोन दिवसात निलंबीत करण्यात येणार असल्याचे वरीष्ठ पोलिस अधिकाºयांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी