शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टेरॉइड इंजेक्शन’चा गोरखधंदा करणारे कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:17 IST

तीनही आरोपींना सिटी कोतवाली पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.

अकोला : ‘स्टेरॉइडच्या इंजेक्शन’ची अवैधरीत्या खुलेआम विक्री करणाऱ्या सिव्हिल लाइन रोडवरील सनी हेल्थ सेंटर आणि या हेल्थ सेंटरच्या संचालकाच्या खोलेश्वर येथील निवासस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री छापेमारी केल्यानंतर अटक केलेल्या तीनही आरोपींना सिटी कोतवाली पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती आहे.खोलेश्वर येथील रहिवासी सचिन ओमप्रकाश शर्मा याच्या मालकीचे सिव्हिल लाइन रोडवरील सनी हेल्थ एंटरप्रायजेस आणि खोलेश्वर येथील निवासस्थानावरून जीममध्ये जाणाºया युवक व महिलांना बॉडी बनविण्यासाठी स्टेरॉइडचे इंजेक्शन विनापरवानगी तसेच अवैधरीत्या आणि खुलेआम विक्री करीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली होती. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री सनी हेल्थ सेंटर व त्याच्या निवासस्थानी एकाच वेळी छापेमारी केली. या छापेमारीत दोन्ही ठिकाणांवरून १ लाख ८५ हजार रुपयांचा स्टेरॉइड इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर या ठिकाणावरून सचिन ओमप्रकाश शर्मा रा. खोलेश्वर, विनायक मनोज सुळे रा. हरिहरपेठ व स्वप्निल कैलास गाडेकर रा. तुकाराम चौक या तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अन्न व औषध सौंदर्यप्रसाधन कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यासोबतच आरोग्यास घातक असलेले काही औषधे व प्रोटिन जप्त करण्यात आले आहेत. जबरी चोरीतील आरोपीया तीन आरोपीपैंकी एक आरोपी हा जबरी चोरीचाही आरोपी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या तीनमधील एका आरोपीविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातच जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. त्यामुळे गुन्हेगारी पृष्ठभूमीतूनच या आरोपींनी स्टेरॉइड इंजेक्शनचा गोरखधंदा सुरू केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी