शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

३९ जणांना गंडविणार्‍या सराफास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 02:11 IST

अकोला : जुने शहरातील प्रभू ज्वेलर्समध्ये रकमेची ठेव ठेवल्यास त्यावर अधिक जादा व्याजदरासह विविध आमिष दाखवून तब्बल ३९ जणांची ४0 लाख रुपयांनी फसवणूक करणार्‍या सराफा व्यावसायिकास डाबकी रोड पोलिसांनी बुधवारी  न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याच्या भावालाही अटक केली असून, त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. 

ठळक मुद्देसराफा व्यावसायिकाचा गोरखधंदा उघडप्रभू ज्वेलर्सचे दोन संचालक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातील प्रभू ज्वेलर्समध्ये रकमेची ठेव ठेवल्यास त्यावर अधिक जादा व्याजदरासह विविध आमिष दाखवून तब्बल ३९ जणांची ४0 लाख रुपयांनी फसवणूक करणार्‍या सराफा व्यावसायिकास डाबकी रोड पोलिसांनी बुधवारी  न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याच्या भावालाही अटक केली असून, त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. जुने शहरातील शिव नगर येथील प्रभू ज्वेलर्सच्या नावाखाली सत्यनारायण ऊर्फ  संजय राधेश्याम अनासने व विजय ऊर्फ शिवनारायण राधेश्याम अनासने यांनी अधिक व्याजदराचे आमिष देऊन शहरातील ३९ नागरिकांकडून तब्बल ४0 लाख रुपयांची रक्कम गोळा केली. पैसे घेताना त्यांनी प्रभू ज्वेलर्सच्या पावत्या देऊन हा व्यवहार केला. या ३९ नागरिकांच्या ४0 लाख रकमेची व्याजासह परतफेड करण्याचा कालावधी जवळ आल्यानंतर या दोघांनी पैसे देण्यास नकार दिला. या दोघांनी ३३ लाख ४७ हजार रुपयांची उचल नागरिकांकडून केली आहे. दरम्यान, त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रारदारांची संख्या वाढत असून, ही संख्या ३९ जणांवर पोहोचली असून, हा आकडाही ३९ लाख ८७ हजार रुपये झाला आहे. यामध्ये छाया विजय ऐललकार (रा. डाबकी रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सत्यनारायण ऊर्फ संजय राधेश्याम अनासने, राधेश्याम माधवसा अनासने, शिवनारायण ऊर्फ विजय राधेश्याम अनासने सर्व राहणार सागर अपार्टमेंट, कौलखेड व आप्पाजी तडोकार (रा. नावाथे प्लॉट, अमरावती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सराफा व्यावसायिकांनी दिलेल्या पावत्या बनावट असून, त्या पावत्यांच्या आधारे पैसे घेऊन ते उपयोगातही त्याने आणले असल्याचे तपासात उघड झाले आहे. सध्या पोलिसांनी यामध्ये विजय अनासने व त्याचा भाऊ या दोघांना अटक केली आहे. त्यात न्यायालयाने विजय अनासने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Goldसोनं