शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

खंडणी बहाद्दर महिलेस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:30 IST

अकोला : काळी जादू तसेच भूत-भानामतीचा धाक दाखवत  गत १५ वर्षांपासून सिंधी कॅम्पमधील एका युवतीला  लुटणार्‍या खंडणी बहाद्दर महिलेस खदान पोलिसांनी  शनिवारी रात्री अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयासमोर  हजर केले. न्यायालयाने आरोपी महिलेस २८ सप्टेंबरपर्यंत  पोलीस कोठडी सुनावली. तिच्याकडून ५0 हजार रुपयांची  खंडणीची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसराफांची नावे समोर येणार५0 हजारांची रोकड जप्त

अकोला : काळी जादू तसेच भूत-भानामतीचा धाक दाखवत  गत १५ वर्षांपासून सिंधी कॅम्पमधील एका युवतीला  लुटणार्‍या खंडणी बहाद्दर महिलेस खदान पोलिसांनी  शनिवारी रात्री अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयासमोर  हजर केले. न्यायालयाने आरोपी महिलेस २८ सप्टेंबरपर्यंत  पोलीस कोठडी सुनावली. तिच्याकडून ५0 हजार रुपयांची  खंडणीची रक्कम जप्त करण्यात आली आहे.सिंधी कॅम्पमधील पक्की खोली येथील रहिवासी काजल  कमलकुमार चंदवानी (२७) या युवतीच्या घरी गत १५ वर्षां पूर्वी निमवाडी परिसरातील रहिवासी आरती संतोष खरे  नामक महिला घरकाम करण्यासाठी येत होती. यादरम्यान  काजल चंदवानी हिची प्रकृती ठीक राहत नसल्याने आरती  खरे या महिलेने तिला काळी जादू येत असल्याचे सांगत  आजार बरे करण्याच्या नावाखाली खंडणी उकळणे सुरू  केले. अंगात बाबा येत असल्याचे सांगून त्या बाबाच्या  माध्यमातून काजलचे सर्व आजार ठीक करण्याचीही  नाटकबाजी करण्यात आली; मात्र हा प्रकार युवतीच्या लक्षात  येताच तिने सदर प्रकरणाची तक्रार खदान पोलीस ठाण्यात  केली. खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी आरती खरे हिला  ५0 हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहात अटक केली.  ितच्याकडून ५0 हजार रुपये जप्त करण्यात आले असून,  आणखी काही दागिने मिळण्याची शक्यता आहे. या महिला  आरोपीस खदान पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर  केले असता न्यायालयाने आरोपी महिलेस २८ सप्टेंबरपर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे. या महिलेने काजल चंदवानी  यांचा विवाह ४ डिसेंबर २0१६ रोजी झाल्यानंतर काजलच्या  मोबाइलवर वारंवार संपर्क करीत तिला खंडणी मागितली.  एवढेच नव्हे, तर आरती खरे ही महिला मध्य प्रदेशातही  जाऊन आली. पैसे व दागिने देण्यास नकार देताच काळी  जादू करीत काजलची आजी, आई-वडील व कुटुंबीयांना  जीवे मारण्याची धमकी दिली होती.