शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बंददरम्यान हिंसा करणाऱ्या २४ आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:03 IST

न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविली आहे.

अकोला : केंद्र सरकारने सीएए, एनआरसी, एनपीआर यासारख्या कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे या कायद्याच्या विरोधात बुधवारी बंद पुकारण्यात आला होेता. या बंदला पातूर, बाळापूर, अकोला येथे हिंसक वळण देणाºया ४५ जणांविरोधात तीनही ठिकाणच्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी २४ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविली आहे.केंद्र सरकारने सीएए, एनआरसी, एनपीआर यासारख्या कायद्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात बुधवारी बंद पुकारण्यात आला होेता. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित या बंदमध्ये बाळापूर, पातूर, अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेत कायदा व सुव्यवस्थोचा प्रश्न निर्माण झाला होता. या बंददरम्यान आंदोलकांनी दुकाने, वाहनानांची तोडफोड केल्याच्याही घटना घडल्या असून, पोलिसांवर दगडफेक झाल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला. त्यामुळे पोलीस प्रशासनाने पातूर, बाळापूर, अकोला येथील ३३ जणांवर भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३५३, ३३२, ३३६, ३३७, ४२७, राष्ट्रीय महामार्ग कायदा कलम ८ ब, सहकलम महाराष्ट्र पोलीस पोलीस कायदा कलम १३५, कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, १५३ सार्वजनिक मालमत्तेची हानी पोहोचविण्यास प्रतिबंध कायदा १९८४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर बाळापूर पोलीस स्टेशनला भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, ३४१, १८८, महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम १३५, तर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातही काही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४५२, १४३, १४७, १४९, ३४१, ३४२, १८८, १०९ सहकलम १३४, १३५, १४० क्रिमिनल लॉ अमेनमेन्ट अ‍ॅक्ट १९३५ अन्वये कलम ७ नुसार गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर अकोला पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली असता गुरुवारपर्यंत ४५ आरोपींपैकी २४ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या २४ आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी