शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

रात्रगस्तीत पोलीस सतर्क; दंगा नियंत्रण पथकाची रात्रभर गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 1:11 PM

  अकोला: शहरात पोलिसांचा बंदोबस्त तसेच पोलीस ठाण्यांमधील मध्यरात्रीच्या कामकाजाची लोकमतच्या चमूने शनिवारी मध्यरात्री पाहणी केली असता पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस सतर्क असल्याचे दिसून आले.

- सचिन राऊत

  अकोला: शहरात पोलिसांचा बंदोबस्त तसेच पोलीस ठाण्यांमधील मध्यरात्रीच्या कामकाजाची लोकमतच्या चमूने शनिवारी मध्यरात्री पाहणी केली असता पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस सतर्क असल्याचे दिसून आले. तर दंगा नियंत्रण पथकाची रात्रभर शहरात गस्त चालू असल्याचेही लोकमतच्या मध्यरात्रीचे अकोला शहर या विशेष पाहणीत स्पष्ट झाले. पोलिसांना रात्री उशिरा मद्यधुंदांचा प्रचंड त्रास असल्याची माहिती त्यांनी दिली.मध्यरात्रीनंतरचे अकोला शहर हे विशेष सदर लोकमतद्वारे चालविण्यात येत आहे. यामध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर अकोला शहरातील पोलीस ठाणे तसेच महत्त्वाच्या ठिकाणांवरील पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली असता यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त सतर्क असल्याचे दिसून आले. पोलीस ठाण्यांच कामकाजही योग्यरीत्या सुरू असल्याचे या रात्र पाहणीत समोर आले.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावूनच महिला कर्मचारीही रात्र गस्त तसेच पोलीस ठाण्यांचे कामकाज सांभाळताना दिसल्या. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री १ वाजेच्या दरम्यान पाहणी करीत असताना एक कुटुंबीय तक्रार देण्यासाठी आले होते. तर खदान पोलीस ठाण्यासमोर पोलिसांचे वाहन तपासणी तसेच रात्र गस्त सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर रामदासपेठ पोलीस ठाण्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असून, त्यांनीच पोलीस ठाण्याचे कामकाज हाताळल्याचे लोकमतच्या पाहणीत समोर आले. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसर आणि सातव चौकामध्ये दंगा नियंत्रण पथक गस्तीत असल्याचे या पाहणीत समोर आले. अकोट फैल पोलीस ठाण्यातही अधिकारी आणि कर्मचारी एका परिसरात वाद सोडविताना त्रस्त होते. तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीके चौक परिसरात पोलीस कार्यरत होते. डाबकी रोड पोलिसांचेही कामकाज सुरू असल्याचे समोर आले असून, त्यांची गोडबोले प्लॉट रेणुका नगर परिसरात रात्री २ वाजताच्या सुमारास गस्त सुरू होती. जुने शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी वाशिम बायपास परिसरात वाहनांची तपासणी करताना दिसले तर ठाण्याचे कामकाजही यावेळी सुरळीत दिसून आले. एकूणच शहरात पोलिसांची गस्त सुरू असल्याचे वास्तव लोकमतच्या पाहणीमध्ये दिसून आले. 

महिलांसाठी हवा स्वतंत्र कक्षमहिला कर्मचारी रात्र ड्युटी करीत असताना त्यांना स्वतंत्र कक्ष असणे गरजेचे असल्याची माहिती काही महिला पोलीस कर्मचाºयांनी दिली. पोलीस ठाण्यांमध्ये महिलांसाठी स्वतत्र कक्ष असला तर त्यांची कुचंबणा होणार नसल्याची माहिती पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाºयांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशन