शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी साधला 'सौभाग्य'च्या लाभार्थ्यांशी संवाद; अकोला जिल्ह्यातील लाभार्थींचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 16:41 IST

अकोला : सौभाग्य योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील लाभार्थीही जिल्हानिहाय उपस्थित होते.

ठळक मुद्देसौभाग्य योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांचेसह अभियंते व जिल्ह्यातील निवडक लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

अकोला : सौभाग्य योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील लाभार्थीही जिल्हानिहाय उपस्थित होते. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय माहिती केंद्रात महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, अधीक्षक अभियंते पवनकुमार कछोट आणि राहुल बोरीकर, कार्यकारी अभियंता गजेंद्र गडेकर यांचेसह अभियंते व जिल्ह्यातील निवडक लाभार्थ्यांची उपस्थिती होती.पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्राने प्रभावी कामगिरी केली असून, आतापर्यन्त ४७ हजार लाभार्थ्यांना यायोजनेत नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. या योजनेचा पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी ७० वर्षांनंतर महावितरणने समुद्राच्या तळाशी मरीन केबल टाकून घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे पुन्हा एकदा कौतूक केले.४७ हजार लाभार्थ्यांंना वीजजोडण्यासौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागात विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीजजोडणी देण्यात येत असून यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांनानि:शुल्क तर इतर लाभार्थ्यांना नाममात्र ५०० रुपये शुल्क भरून वीजजोडणी देण्यात येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यन्त ४७ हजार लाभार्थ्यांना या योजनेत वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. उर्वरित सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०१८ पर्यन्त वीजजोडणी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागातीलवीजजोडणीपासून वंचित असणाऱ्या कुटुंबांना वीजजोडणी देण्यासाठी १,९४५ कोटी रुपये खर्च येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळ