शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएम’आवास याेजनेचा खेळखंडाेबा; पाच वर्षांत ६४४७ पैकी ६२५ घरांचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 10:40 IST

PM Awas Scheme : काही लाभार्थींवर ऐन पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आल्याने त्यांच्यासमाेर संकट ठाकले आहे.

- आशिष गावंडे

अकाेला : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास याेजनेचा खेळखंडाेबा झाला असून मागील पाच वर्षांच्या कालावधीत ६ हजार ४४७ मंजूर घरांपैकी केवळ ६२५ घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. शहरात ‘पीएम’आवासचे असंख्य लाभार्थी मागील अनेक महिन्यांपासून भाड्याच्या घरात वास्तव्याला असून घर बांधकामाचे हप्ते रखडल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी हाेण्याची वेळ आली आहे़ यातील काही लाभार्थींवर ऐन पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आल्याने त्यांच्यासमाेर संकट ठाकले आहे.

शहरात पंतप्रधान आवास याेजनेंतर्गत घरकुलांसाठी प्रकल्प अहवाल तयार करणे व तांत्रिक सल्लागार म्हणून महापालिका प्रशासनाने शून्य कन्सलटन्सीची नियुक्ती केली. सुमारे ६४ हजार पेक्षा अधिक लाभार्थींनी अर्ज सादर केल्यानंतर कन्सलटन्सीने सर्वप्रथम झाेपडपट्टी भागातील प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सादर केला. दुसऱ्या टप्प्यात घरासाठी जागा नसणाऱ्या लाभार्थींची यादी व तिसऱ्या टप्प्यात स्वत:च्या जागेवर घरकुल बांधून देण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. आजराेजी या तीनही टप्प्यातील लाभार्थींची घरे अर्धवट असल्याचे चित्र असून याव्यतिरिक्त गुंठेवारी, गावठान व लिज पट्टा नसलेल्या जमिनीवरील लाभार्थींचा काेणीही वाली नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

प्रकल्पाची एकूण किंमत- ४३४. ६३ काेटी रुपये

पाच वर्षांत १२ ‘डीपीआर’ मंजूर

आजवर प्राप्त झालेला निधी-३८ काेटी ७२ लक्ष

खर्च झालेला निधी- २५ काेटी १५ लक्ष

 

एकूण लाभार्थींची संख्या- ६,४४७

ले-आउटधारक लाभार्थी- ३,१२९

गुंठेवारी जमिनीवरील लाभार्थी- २,४७०

गावठाण जमिनीवरील लाभार्थी- ८४८

अर्धवट घरांची संख्या- ९११

बांधकाम पूर्ण झालेली घरे- ६२५

 

दुसरा हप्ता देण्यास नकार

पात्र लाभार्थींना अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्याने त्यांनी जुन्या घराचे बांधकाम पाडून नवीन बांधकामाला सुरुवात केली़ आता अचानक अनुदानाचा दुसरा हप्ता देण्यास महापालिकेने हात आखडता घेतल्यामुळे लाभार्थींसमाेर संकट निर्माण झाले आहे. यामुळे पावसाळ्यात लाभार्थींचे हाल हाेणार आहेत.

 

शहरातील गुंठेवारी, गावठान जमिनीसह लिज पट्टा नसलेल्या जमिनीवरील पात्र लाभार्थींना निर्माण झालेली तांत्रिक अडचण दूर करण्याच्या प्रयत्नात आहाेत. याेजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थींना घरे उपलब्ध करून दिली जातील.

- नीमा अराेरा आयुक्त, मनपा

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना