शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘खेळा मदतीसाठी’ : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले खेळाडू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 14:16 IST

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूकडून शंभर रुपये जिल्हा प्रशासन घेणार आहे.

अकोला: पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात मदत करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने ‘खेळा मदतीसाठी’ हा अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूकडून शंभर रुपये जिल्हा प्रशासन घेणार आहे.या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध संस्थांनी आपल्या स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करू न, प्रत्येक सहभागी खेळाडूंकडून १०० रुपये सहभाग शुल्क भरू न हा निधी जमा करावयाचा असून, तो मदतनिधी पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने २९ आॅगस्ट रोजी विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, क्रीडा संस्था, संघटना, बँक कर्मचारी संघटना व समाजातील सर्व व्यक्तींचे समूह यांनी आपल्या स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावयाचे आहे. त्या निमित्ताने सहभागी होणारे स्पर्धक, क्रीडापटू यांच्याकडून किमान १०० रुपये नाममात्र सहभाग शुल्क घेऊन, संकलन होणारी संपूर्ण रक्कम गुणवत्ता विकास कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सहभागी स्पर्धकांच्या यादीसह जमा करण्यात येणार आहे. संकलित संपूर्ण रक्कम पूरग्रस्त निधी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला प्रदान करण्यात येणार आहे. शंभर रुपये किंवा अधिक निधी देणाºया क्रीडापटूंना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र व स्पर्धा आयोजित करणाºया संस्थेला गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. खेळा मदतीसाठी (प्ले फॉर चॅरिटी) या घोषवाक्यांतर्गत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या आयोजनाबाबत कुठल्याही प्रकारची सक्ती नसून, स्वेच्छेने आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्या नेतृत्वात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर