शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
3
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
4
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
5
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरमध्ये तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
6
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
7
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
9
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
10
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
11
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
12
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
13
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
14
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
15
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
16
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
17
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
18
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
19
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
20
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   

प्लास्टिक बंदी;  ग्रामसेवक, तलाठी, पोलीसही करणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 16:18 IST

अकोला : प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकपासून बनवलेल्या डिस्पोजेबल वस्तू, पॅकेजिंग पाऊच, वेष्टन या सर्व प्लास्टिकचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक, किरकोळ विक्री, आयात, वाहतूक करण्यास बंदी असताना हे प्रकार आढळून आल्यास महापालिकेसोबतच तलाठी, ग्रामसेवक, शिक्षणाधिकारी, पोलीस यांच्यासह विविध विभागाला कारवाईसाठी अधिसूचनेनुसार अधिकार देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसंपूर्ण राज्यात प्लास्टिकबंदीसाठीची अधिसूचना २३ मार्च २०१८ रोजीच प्रसिद्ध केली आहे. कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार कोणाला आहेत, या बाबी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे यापुढे प्लास्टिकचा वापर करणारे एवढ्या यंत्रणांच्या कचाट्यातून सुटणे अशक्य ठरणार आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकपासून बनवलेल्या डिस्पोजेबल वस्तू, पॅकेजिंग पाऊच, वेष्टन या सर्व प्लास्टिकचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक, किरकोळ विक्री, आयात, वाहतूक करण्यास बंदी असताना हे प्रकार आढळून आल्यास महापालिकेसोबतच तलाठी, ग्रामसेवक, शिक्षणाधिकारी, पोलीस यांच्यासह विविध विभागाला कारवाईसाठी अधिसूचनेनुसार अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे प्लास्टिकचा वापर करणारे एवढ्या यंत्रणांच्या कचाट्यातून सुटणे अशक्य ठरणार आहे. विशेष म्हणजे, प्लास्टिक, थर्माकोलच्या वापरातून सजावटीवरही बंदी आहे.शासनाने महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा २००६ अंतर्गत संपूर्ण राज्यात प्लास्टिकबंदीसाठीची अधिसूचना २३ मार्च २०१८ रोजीच प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये कोणत्या प्लास्टिक उत्पादनांवर बंदी आहे. तसेच कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार कोणाला आहेत, या बाबी स्पष्ट केल्या आहेत.

प्लास्टिकच्या या वस्तू वापरावर बंदीकायद्याने प्लास्टिकपासून बनवल्या जाणाºया पिशव्या (हॅण्डल असलेल्या व नसलेल्या), थर्माकॉल (पॉलिस्टायरिन) व प्लास्टिकपासून बनवण्यात येणाºया व एकदाच वापरल्या जाणाºया डिस्पोजेबल वस्तूंमध्ये ताट, कप्स, प्लेट, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडे, वाटी, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉपलिन बॅग्स, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे पाऊच, कप, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ साठवण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक, त्याचे वेष्टन इत्यादींचे उत्पादन करणे, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात, वाहतुकीवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे.

रिकाम्या बाटल्यांवर पुनर्चक्रण, ग्राहकाला मिळणार पैसेखाद्यपदार्थ साठवण्यायोग्य व उच्च दर्जा प्राप्त बिसफेनॉल अ-विरहित पीईटी व पीईटीई पासून बनवलेल्या ०.५ लीटरपेक्षा कमी धारणक्षमता नसलेल्या बाटल्यांना अनुमती आहे. मात्र, त्या बाटल्यांवर पूनर्चक्रणासाठी आधीच ठरवून त्या बाटल्यांची वापरकर्त्यांकडून पुन्हा खरेदी केली जाईल, असे ठळकपणे प्रसिद्ध करावे लागणार आहे. किमान १ ते २ रुपये किमतीने त्या रिकाम्या बाटलीची खरेदी केली जाणार आहे. त्यातून औषधांच्या वेष्टनासाठी वापर, वन, फलोत्पादन, कृषी, घनकचरा हाताळण्यासाठी कंपोस्टेबल प्लास्टिक व पिशव्या वगळण्यात आल्या आहेत.

दुधाच्या पिशवीचेही मिळणार पैसे!दुधाच्या पॅकेजिंगसाठी अन्न साठवणुकीचा दर्जा असलेल्या परंतु, ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी नसलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू राहणार आहे. त्यासाठी पिशव्यांचा वापर झाल्यानंतर त्यावर पुनर्चक्रणाची प्रक्रिया करण्यासाठी ५० पैशांपेक्षा अधिक किमतीने त्या परत घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी दूध डेअरी, वितरक, विक्रेते यांना त्याची खरेदी करावी लागणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPlastic banप्लॅस्टिक बंदीPoliceपोलिस