शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीनंतरही मान्सूनपूर्व कपाशीची लागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 10:18 IST

आता कृषी विभाग संबंधित शेतकऱ्यांसह विक्रेते आणि बियाणे कंपन्यांवर कारवाईच्या तयारीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी विभागाने वारंवार जनजागृती करूनही काही शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातून छुप्या मार्गाने बियाण्यांची खरेदी करून कपाशीची मान्सूनपूर्व लागवड केल्याची माहिती खुद्द कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली. त्यामुळेच काही भागामध्ये कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता कृषी विभाग संबंधित शेतकऱ्यांसह विक्रेते आणि बियाणे कंपन्यांवर कारवाईच्या तयारीत आहेत.बोंडअळींसह इतर कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत वर्षभर जनजागृती मोहीम राबविल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले; परंतु तरीदेखील अकोल्यासह जवळपासच्या भागात अनेक शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली.स्थानिक स्तरावर बियाणे मिळत नसल्याने काही शेतकºयांनी मध्य प्रदेशातून छुप्या मार्गाने बियाण्यांची खरेदी करून कपाशीची लागवड केल्याने बोंडअळीचे जीवनचक्र कायम असल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाºयाचे म्हणणे आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करूनही काही शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली, अशा सर्व शेतकºयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत कृषी विभाग असल्याची माहिती आहे. गत चार ते पाच वर्षांपासून राज्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.कृषी विभागाने गावोगावी शेतीशाळा घेऊन शेतकºयांची जनजागृती केली. त्यानंतरही जिल्ह्यातील शेकडो शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. कृषी विभागाच्या या मोहिमेला यश आल्याचे दिसत नाही. मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करणाºया शेतकºयांना बोंडअळी प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे.

गत वर्षभरापासून कृषी विभागातर्फे विविध माध्यमातून शेतकºयांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय, मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी करु नका, असे आवाहनदेखील करण्यात आले होते; मात्र तरीदेखील शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. त्यामुळे बियाणे विक्रेते, कंपन्यांसह शेतकºयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- मोहन वाघ,कृषी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी