शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठी काढून करायचा चिमुकल्या मुलींवर शारीरिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 19:11 IST

अकोला - जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावसार पंचबंगला परिसरातील रहिवासी चंद्रकांत जुनगडे याच्या मुलीसोबत त्याच्याच घरी खेळायला-बागळायला येणाऱ्या १२ ते १५ वर्ष वयोगटातील तीन चिमुकल्या मुलींच्या नावाने चिठ्ठ्या काढून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देचंद्रकांत काशीनाथ जुनगडे (३५) याच्या घरी याच परिसरातील रहिवासी तसेच त्याच्या लहान मुलीच्या मैत्रिणी म्हणजेच तीन मुली खेळण्यासाठी येत होत्या. या तीन मुलींसोबत चंद्रकांत जुगनडे हा नराधमही खेळण्याचे नाटक करीत असे.या मुलींची एका चिठ्ठीवर नावे लिहून ती चिठ्ठी त्याच्याच मुलीला काढायला सांगायचा. ज्या मुलीचे नाव चिठ्ठीत आले, तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार हा जुनगडे करीत होता.

अकोला - जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावसार पंचबंगला परिसरातील रहिवासी चंद्रकांत जुनगडे याच्या मुलीसोबत त्याच्याच घरी खेळायला-बागळायला येणाऱ्या १२ ते १५ वर्ष वयोगटातील तीन चिमुकल्या मुलींच्या नावाने चिठ्ठ्या काढून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा नराधम रोज तीन मुलींच्या नावाने चिठ्ठ्या टाकत असे, जिचे नाव उचललेल्या चिठ्ठीत येईल, तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार क रीत असल्याचा खळबळजनक खुलासा या मुलींनी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.भावसार पंच बंगला परिसरातील रहिवासी चंद्रकांत काशीनाथ जुनगडे (३५) याच्या घरी याच परिसरातील रहिवासी तसेच त्याच्या लहान मुलीच्या मैत्रिणी म्हणजेच तीन मुली खेळण्यासाठी येत होत्या. या तीन मुलींसोबत चंद्रकांत जुगनडे हा नराधमही खेळण्याचे नाटक करीत असे. या मुलींची एका चिठ्ठीवर नावे लिहून ती चिठ्ठी त्याच्याच मुलीला काढायला सांगायचा. ज्या मुलीचे नाव चिठ्ठीत आले, तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार हा जुनगडे करीत होता. ‘लप्पन-छप्पन’ या लहान मुलींच्या खेळाचे नाव देऊन त्याने या चिमुकल्या मुलींचे लैंगिक शोषण सुरूकेले होते. या तीन मुलींच्या आईपैकी एका मुलीच्या आईने २३ मार्च रोजी दुपारी मुलगी घरी आल्यानंतर तिला कपडे बदलण्यास सांगितले. मात्र, मुलीने कपडे बदलण्यास नकार दिला. त्यामुळे तिची आई संतापाने तिच्यावर ओरडल्याने मुलीने तिच्यासोबत घडलेला अश्लील प्रकार आईला सांगितला. या तीन मुलींना खेळण्याच्या बहाण्याने रोज बोलावून यामधील एका मुलीची चिठ्ठी रोज उघडण्यात येत होती. ज्या मुलीचे चिठ्ठीत नाव निघेल, तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव या मुलीच्या आपबितीमधून समोर आले. नराधम चंद्रकांत जुनगडे याने या तीन मुलींचा शारीरिक छळ सुरू केल्याचे त्या मुलींच्या आईच्या लक्षात येताच, त्यांनी जुने शहर पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार गजानन पडघन यांनी क्षणाचाही विलंब न लावता तीनही मुलींची विचारपूस केली. वास्तव समोर येताच चंद्रकांत जुनगडे याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध मुलींचा शारीरिक अत्याचार करणे, विनयभंगासह धमकी देणे व पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपी चंद्रकांत जुनगडे याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRapeबलात्कारCrimeगुन्हा