अतुल जयस्वाल अकोला, दि. ११- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात पदव्युत्तर (पी.जी.) शाखेचे आणखी तीन नवे अभ्यासक्रम सुरू करण्यास भारतीय वैद्यक परिषद (एम.सी.आय.)ने मान्यता दिली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचनाशास्त्र (अँनाटॉमी), जनऔषधशास्त्र (पीएसएम) आणि चर्मरोगशास्त्र (स्किन) हे तीन नवे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची संख्या आता १0 झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अकोल्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाल्यानंतर वर्ष २00३ मध्ये एमबीबीएसची पहिली तुकडी निघाली होती. त्यानंतर वर्ष २0१४-१५ या शैक्षणिक वर्षांपासून येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमांना पहिल्यांदा मान्यता मिळाली. त्यावेळी औषधनिर्माणशास्त्र (फॉर्मेकोलॉजी-एमडी) आणि सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबॉयलॉजी-एमडी) या दोन अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २0१५-१६ या शैक्षणिक वर्षांत न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक मेडिसिन -एमडी), जीवरसायनशास्त्र (बायोकेमेस्ट्रि-एमडी), स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र (ओबीजीवाय- एस), विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी-एमडी), शरीरक्रियाशास्त्र (फिजीओलॉजी-एमडी) या पाच नव्या अभ्यासक्रमांना एमसीआयकडून मान्यता मिळाली. त्यामुळे गतवर्षीपर्यंत वैद्यकीय महाविद्यालयात ह्यपीजीह्णचे सात अभ्यासक्रम झाले. येथे आणखी नवे अभ्यासक्रम सुरू व्हावे, यासाठी महाविद्यालय प्रशासनाने एमसीआयकडे प्रस्ताव पाठवून त्याबाबत पाठपुरावा केला. अखेर एमसीआयने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणखी तीन नवे अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीजीच्या वाढलेल्या जागा हे अकोल्यासाठी नक्कीच भूषणावह बाब ठरणार आहे.'पीजी'च्या जागा झाल्या २0जीएमसीमध्ये आतापर्यंत पीजीचे सात अभ्यासक्रम होते. आता तीन अभ्यासक्रम नव्याने सुरू होणार आहेत. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रत्येकी दोन जागा आहेत. त्यामुळे आता जीमएसीमध्ये पीजीच्या २0 जागा झाल्या आहेत. आणखी पाच जागा वाढणारमहाविद्यालय प्रशासनाने स्त्रीरोग प्रसूतीशास्त्राच्या तीन आणि चर्मरोग शास्त्राच्या दोन अशा एकूण पाच जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव एमसीआयकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास पीजीच्या जागांमध्ये पाचची भर पडून त्या २५ होणार आहेत.
‘जीएमसी’मध्ये ‘पीजी’चे तीन नवे अभ्यासक्रम!
By admin | Updated: March 12, 2017 02:20 IST