शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पेट्रोल दरवाढ; शिवसेनेचा सायकल रिक्षा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:29 AM

अकोला : केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भाजपाने अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत पेट्रोल-डीझलच्या किमतीत वाढ करून जनतेसाठी ‘अच्छे दिन’ आणले आहेत. भाजपा सरकारने लादलेल्या अधिभारामुळे इंधनाच्या किमती आकाशाला भिडल्याचा आरोप करीत शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल रिक्षा मोर्चा काढून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. 

ठळक मुद्दे‘डीबी स्कॉड’ पथक कुचकामीशहर प्रमुख झाले ‘सारथी’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भाजपाने अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत पेट्रोल-डीझलच्या किमतीत वाढ करून जनतेसाठी ‘अच्छे दिन’ आणले आहेत. भाजपा सरकारने लादलेल्या अधिभारामुळे इंधनाच्या किमती आकाशाला भिडल्याचा आरोप करीत शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल रिक्षा मोर्चा काढून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. पेट्रोल-डीझलच्या किमतीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. २0१४ मधील लोकसभा निवडणुकीत इंधनाच्या किमती कमी करण्याचे आश्‍वासन भाजपाने दिले होते. केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजपाला आश्‍वासनांचा विसर पडल्याचे दिसत असून, इंधनाच्या किमती आवाक्याच्या बाहेर गेल्या आहेत. सोने-चांदीच्या व्यवहारावर तीन टक्के कर आकारणी केल्यानंतर जीएसटी लागू केला. जीएसटीमुळे देशाचा ‘जीडीपी’ घसरला असून, त्यापाठोपाठ आता पेट्रोल-डीझलच्या दरात मोठी वाढ केली आहे. काळ्या पैशांचा पाऊस पाडण्याची घोषणा करणार्‍या भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याचा आरोप करीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल रिक्षा मोर्चा काढला. शासनाने इंधनाची दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास सेनेच्यावतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मोर्चात मनपा गटनेता राजेश मिश्रा, शहर प्रमुख अतुल पवनीकर, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशिकांत चोपडे, प्रदीप गुरुखुद्दे, सागर भारुका, शरद तुरकर, जि.प. सर्कल प्रमुख दिनेश सरोदे, सुरेंद्र विसपुते, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, के दार खरे, बंडू सवाई, योगेश गीते, अश्‍विन नवले, अविनाश मोरे, राहुल कराळे, योगेश बुंदेले, ज्योत्स्ना चोरे, मा. नगरसेविका देवश्री ठाकरे, शुभांगी किनगे, सुनीता श्रीवास, सुनील डुक रे, रवी सातपुते, रूपेश ढोरे, गजानन बोराळे, सुनील दुर्गिया, लक्ष्मण पंजाबी, प्रकाश वानखडे, विलास ताले, राजेश इंगळे, सतीश मानकर, स्वप्निल अहिर, रोशन राज, उमेश श्रीवास्तव आदींसह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते. 

‘डीबी स्कॉड’ पथक कुचकामीशिवसेनेत मोर्चासाठी सक ाळपासूनच लगबग सुरू झाली होती. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे शिवसैनिक जमा झाले. त्यानंतर शिवसैनिकांनी स्थानिक विश्रामगृहाकडे मोर्चा वळवला. मोर्चाचे नेमके ‘लोकशन’ शोधण्यात सिव्हिल लाइनचे ‘डीबी स्कॉड’ अपयशी ठरल्यामुळे की काय, ऐन वेळेवर ठाणेदारांसह कर्मचार्‍यांची धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले. 

शहर प्रमुख झाले ‘सारथी’शिवसेनेच्या सायकल रिक्षा मोर्चात शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी स्वत: रिक्षा चालवला. या रिक्षात जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांचा समावेश होता. हातात निषेधाचे फलक घेऊन शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.