जनता भाजी बाजारात मनपाच्या पथकावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:23 AM2021-03-17T11:23:14+5:302021-03-17T11:23:25+5:30

Akola News कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या पथकावर भाजी विक्रेत्यांनी अचानक दगडफेक केल्याचा प्रकार घडला.

People throw stones at the Corporation's squad in the vegetable market | जनता भाजी बाजारात मनपाच्या पथकावर दगडफेक

जनता भाजी बाजारात मनपाच्या पथकावर दगडफेक

Next

अकाेला : काेराेनाच्या अनुषंगाने शहरात सायंकाळी ५ नंतर दुकाने अथवा काेणताही व्यवसाय सुरू ठेवण्याचे निर्देश असताना, जनता भाजी बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्या अतिक्रमकांना हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी दगडफेक करणाऱ्या व्यावसायिकांविराेधात फाैजदारी तक्रार दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी दिल्याची माहिती आहे. फेब्रुवारी महिन्यापासून शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दरम्यान, जिल्ह्यासह शहरात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत बाजारपेठ सुरू ठेवण्याचे निर्देश जारी केले. दुसरीकडे शहरात फाेफावलेल्या अतिक्रमणाची समस्या दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली. या जागेकडे लघू व्यावसायिकांनी पाठ फिरविल्याचे समाेर आले आहे. गांधी चाैक, जुना भाजी बाजार, खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैक, जनता भाजी बाजार, जठारपेठ चाैक आदी ठिकाणी लघू व्यावसायिक व अतिक्रमकांनी ठाण मांडल्याचे चित्र कायम आहे. अतिक्रमणाच्या समस्येमुळे सर्वसामान्य अकाेलेकर वैतागले आहेत. रस्त्यालगत दुकाने थाटल्याने वाहतुकीचा खाेळंबा निर्माण झाला आहे. रस्त्यातून वाट काढताना नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. या संदर्भात मनपा प्रशासनाकडे असंख्य तक्रारी हाेत आहेत. नागरिकांना त्रास हाेत असल्याची दखल घेत, मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी मागील काही दिवसांपासून अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाइ सुरू केली आहे. मंगळवारी श्रीराम द्वारच्या बाजूच्या बाेळीत सायंकाळी ५ नंतरही भाजीपाला व्यावसायिकांची दुकाने खुली असल्याची माहिती मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला मिळाली. या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या पथकावर भाजी विक्रेत्यांनी अचानक दगडफेक केल्याचा प्रकार घडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.

 

आयुक्त निघून जाताच दगडफेक!

जनता भाजी बाजारातील अतिक्रमण हटविण्यासाठी खुद्द आयुक्त निमा अराेरा रस्त्यावर उतरल्या. काही व्यावसायिकांचे साहित्य ताब्यात घेतल्यानंतर आयुक्त मनपामध्ये परत आल्या. आयुक्त निघून जाताच, संतप्त भाजीपाला व्यावसायिकांनी मनपाच्या वाहनांवर बटाटे, कांदे फेकले. त्यानंतर, दगडफेक करीत जेसीबीसह इतर वाहनांच्या काचा फाेडल्या.

 

जागा दिल्यानंतरही मुजाेरी!

आयुक्त निमा अराेरा यांनी लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांना शहरात दाेन ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. याकडे फेरीवाल्यांनी पाठ फिरविली आहे. जठारपेठ चाैकातील भाजी विक्रेत्यांना मनपा शाळा क्रमांक ५ मध्ये आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून ओटे बांधून दिले, तरीही अतिक्रमकांची मुजाेरी कायम असल्याचे चित्र आहे.

Web Title: People throw stones at the Corporation's squad in the vegetable market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.