शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क आकारुनही सेवा न देणाऱ्या मुंबई येथील मेडीकल सर्व्हीस कंपनीला अकोला ग्राहक मंचाने ठोठावला ५ लाखांचा दंड

By atul.jaiswal | Updated: November 10, 2017 14:15 IST

अकोला : येथील एका व्यक्तीकडून सेवाशुल्क आकारल्यानंतरही त्यांच्या नवजात बालकाची ‘युम्बिलिकल कॉर्ड’(नाळ)चे संकलन करण्याची सेवा देण्याचा करार न पाळणाºया मुंबई येथील एका वैद्यकीय सेवा पुरविणाºया कंपनीला अकोला ग्राहक मंचाने दणका दिला आहे.

ठळक मुद्देयुम्बिलिकल कार्ड संकलित करण्याचा पाळला नाही करारठरल्याप्रमाणे सेवा देण्यात न्यूनता व त्रुटी करीत वैद्यकीय निष्काळजीपणा केला

अकोला : येथील एका व्यक्तीकडून सेवाशुल्क आकारल्यानंतरही त्यांच्या नवजात बालकाची ‘युम्बिलिकल कॉर्ड’(नाळ)चे संकलन करण्याची सेवा देण्याचा करार न पाळणाºया मुंबई येथील एका वैद्यकीय सेवा पुरविणाºया कंपनीला अकोला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. मोठमोठी आश्वासने देऊन व चांगल्या सेवेबद्दल हमी देऊनही ऐनवेळी नकार देणाºया या कंपनीला ग्राहक मंचाने पाच लाखांचा दंड ठोठावण्याचा आदेश ६ नोव्हेंबर रोजी दिला.अकोला येथील चार्टर्ड अकाउंटंट आयुष विजय गोयनका व निकिता आयुष गोयनका या दाम्पत्यास मूल होणार होते. त्यावेळी मुंबई येथील रिजनरेटिव्ह मेडिकल सर्व्हिसेस, प्रा. लि. या कंपनीने ६९ हजार रुपयांचे सेवा शुल्क आकारून या दाम्पत्याच्या होणाºया बाळाचे ‘युम्बिलिकल कॉर्ड’चे संकलन करण्याची सेवा देण्याचा करार केला.गत वर्षी एप्रिल महिन्यात या दोहोंमध्ये हा करार झाला. बाळंतपणाच्या वेळी मात्र सदर कंपनीने व त्यांच्या प्रतिनिधीने या दाम्पत्यास ठरल्याप्रमाणे सेवा देण्यात न्यूनता व त्रुटी करीत वैद्यकीय निष्काळजीपणा केला. कंपनीकडे सदर सेवा देण्यासाठी आधारभूत सुविधा नव्हती व बाळंतपणाच्या ठरलेल्या वेळेस कंपनीने आधी कबूल केल्याप्रमाणे आपल्या पॅनलवरील वैद्यकीय तज्ज्ञाला पाठविले नाही, तसेच स्वत:ची चूक होऊनही आधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सेवेसाठी आकारलेले शुल्क ग्राहकाला परत केले नाही. याबाबत आयुष गोयनका यांनी १ मार्च २०१७ रोजी ग्राहक तक्रार निवारण मंच, अकोला यांच्याकडे सदर कंपनीविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. विद्यमान मंचाने सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. तक्रारकर्ता विधिज्ञ अ‍ॅड. चेतन लोहिया यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून कंपनीने सेवेमध्ये न्यूनता व त्रुटी ठेवल्याचा तसेच अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचा निर्वाळा दिला. या प्रकरणात ग्राहकाला शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई म्हणून कंपनीला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच कंपनीने ग्राहकाकडून वसूल केलेले ६९ हजार रुपये द.सा.द.शे. आठ टक्के दराने व्याजासह ग्राहकाला परत द्यावे, असा आदेशही अध्यक्ष एस. एम. उंटवाले, भारती केतकर व डब्ल्यू. व्ही. चौधरी यांच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला. तक्रारकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. अमित लोहिया व अ‍ॅड. चेतन लोहिया यांनी काम पाहिले.

टॅग्स :Healthआरोग्यCourtन्यायालय