शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस १९ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:52 IST

वाहन कर्ज घेतल्यानंतर त्याच्या परतफेडीसाठी दिलेला १४ लाख रुपयांचा धनादेश अनादरित झाल्याने आरोपी भाऊराव पावसाळे यास प्रथमश्रेणी न्यायालयाने गुरुवारी १९ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

अकोला: निशांत मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी येथून २१ लाख रुपयांचे वाहन कर्ज घेतल्यानंतर त्याच्या परतफेडीसाठी दिलेला १४ लाख रुपयांचा धनादेश अनादरित झाल्याने आरोपी भाऊराव पावसाळे यास प्रथमश्रेणी न्यायालयाने गुरुवारी १९ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. यासोबतच सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सदरचा दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.निशांत पतसंस्थेच्या मुख्य शाखेतून भाऊराव पावसाळे रा. कौलखेड यांनी २१ लाख ९८ हजार ५६८ रुपयांचे कर्ज वाहन विकत घेण्यासाठी घेतले होते. या कर्जाच्या रकमेवर वाहन खरेदी केल्यानंतर सदरचे वाहन त्याने नांदेड महानगरपालिका येथे सिटी बस म्हणून कंत्राटी पद्धतीने चालविण्याकरिता दिले होते. सदरच्या वाहन कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी पावसाळे यांनी निशांत पतसंस्थेला नागपूर नागरी सहकारी बँक लिमिटेड नागपूर शाखा अकोलाचा १४ लाख रुपयांचा धनादेश ११ आॅगस्ट २०११ रोजी दिला होता; मात्र सदरचा धनादेश अनादरित झाल्यानंतर निशांत पतसंस्थेने भाऊराव पावसाळेविरुद्ध कलम १३८ निगोशियबल कायद्याच्या अंतर्गत न्यायालयात तक्रार दिली. यावर आरोपीने बचाव करताना तो स्वत: हे कर्ज भरण्यास जबाबदार नसून, नांदेड महापालिका जबाबदार असल्याचे न्यायालयासमोर सांगितले; मात्र न्यायालयाने साक्ष-पुरावे तपासले असता पाचवे प्रथमश्रेणी न्यायाधीश यांनी आरोपी भाऊराव पावसाळे यास सहा महिने कारावासची शिक्षा सुनावली. यासोबतच १९ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दंडाची रक्कम निशांत पतसंस्थेला देण्याचा आदेश दिला आहे. ही रक्कम न भरल्यास आणखी तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी निशांत पतसंस्थेच्यावतीने अ‍ॅड. श्याम खोटरे व अ‍ॅड. अश्विन काळे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय