शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तीच्या दिवशी शिपायाची गावातून मिरवणूक काढून निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 13:15 IST

सेवानिवृत्तीच्या दिवशी शाळेचे विद्यार्थी व मुख्याध्यापकाने घरापासून ते शाळेपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढून त्याच्या कार्याचा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने सन्मान केला.

ठळक मुद्देशाळेमध्ये शिपाई म्हणून काम करणारे बी.जी. खुळे हे ३0 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले.मुख्याध्यापक संतोष काळपांडे यांनी शिपाई बी.जी. खुळे यांना आगळा-वेगळा निरोप देण्याचा उपक्रम शाळेत घेतला. घरापासून ते शाळेपर्यंत कारमध्ये बसवून लेजीम पथक, ढोल-पथकाच्या तालात गावातून मिरवणूक काढली.

अकोला : शिपाई... आपल्या दृष्टिकोनातून एक चतुर्थश्रेणी कर्मचारी. वरिष्ठांनी वाटेल ते सांगितलेले काम निमूटपणे पार पाडणारा हा शिपाई. त्याच्या वाट्याला सन्मानापेक्षा उपेक्षाच अधिक. असाच एक शिपाई ३0 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाला; परंतु त्याचा सेवानिवृत्तीचा दिवस चिरस्मरणात राहील, असाच होता. सेवानिवृत्तीच्या दिवशी शाळेचे विद्यार्थी व मुख्याध्यापकाने घरापासून ते शाळेपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढून त्याच्या कार्याचा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने सन्मान केला.बार्शीटाकळी तालुक्यातील कोथळी ८00 लोकवस्तीचे गाव. गावात आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आहे. शाळेत ३0 जणांचा स्टाफ आहे. या शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करणारे बी.जी. खुळे हे ३0 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. एवढे वर्ष त्यांनी शाळेसाठी सेवा दिली. सांगेल ते काम केले. येणाऱ्या-जाणाºयांना खुर्ची, प्यायला पाणी, शाळेची स्वच्छता, मुख्याध्यापक, शिक्षकांनी सांगितलेली शैक्षणिक कामे केली. विद्यार्थ्यांना शिक्षकांपेक्षाही अधिक आपलासा वाटणारा व्यक्ती म्हणजे शिपाईच. कारण शाळा सुटताना शेवटची घंटा वाजविणाºया शिपायाकडेच आपले लक्ष असते. या शिपायाचाही सन्मान व्हावा, या दृष्टिकोनातून शाळेचे मुख्याध्यापक संतोष काळपांडे यांनी शिपाई बी.जी. खुळे यांना आगळा-वेगळा निरोप देण्याचा उपक्रम शाळेत घेतला. शिपाई खुळे यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांची घरापासून ते शाळेपर्यंत कारमध्ये बसवून लेजीम पथक, ढोल-पथकाच्या तालात गावातून मिरवणूक काढली. त्यांचे सारथ्य मुख्याध्यापक संतोष काळपांडे यांनी केले. शाळेची पहिली घंटा मुख्याध्यापक यांनी वाजविली आणि सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांनी शिपाई खुळे यांचा सत्कार केला. या सत्कारामुळे खुळे भारावून गेले होते. उपेक्षित शिपायाला सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळालेला सन्मान पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा