शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

 'पंदेकृवि'ने विकसित केली ९७ दिवसांत उत्पादन देणारी सोयाबीनची नवी जात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:55 IST

अकोला : ९७ दिवसांत भरपूर उत्पादन देणारी सोयाबीनची नवी जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली असून, पुढच्या वर्षी खरीप हंगामात पेरणीसाठी ही जात उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देकालावधी कमी करू न हेक्टरी २२ क्विंटल उत्पादन देणारी एएमएस-१००१ (पीडीकेव्ही यलो) या नावाने नवीन जात विकसित करण्यात आली आहे. अगोदरच्या जातीपेक्षा या नवीन सोयाबीन जातीचे उत्पादन जास्त असल्याचा दावा संशोधन करणारे कृषी शास्त्रज्ञ करीत आहेत. विषाणूजन्य रोगास प्रतिकारक असलेली ही जात आपत्कालीन परिस्थितीतही तग धरू न राहते म्हणजेच न लोळणारी, न फुटणारी ही जात आहे.

अकोला : ९७ दिवसांत भरपूर उत्पादन देणारी सोयाबीनची नवी जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली असून, पुढच्या वर्षी खरीप हंगामात पेरणीसाठी ही जात उपलब्ध होणार आहे.राज्यात सोयाबीन तेलबिया पिकाचे क्षेत्र वाढले असून, तेलाची मागणीही वाढल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडच्या चार, पाच वर्षांत हे क्षेत्र जवळपास ३८ ते ४० लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. यानुषंगाने भरघोस उत्पादन देणाºया सोयाबीनवर या कृषी विद्यापीठात संशोधन करण्यात येत होते. यावर्षी हे संशोधन पूर्ण झाले असून, पुढच्यावर्षी पेरणीसाठी मान्यताही प्राप्त झाली आहे. सोयाबीन उत्पादनाचा कालावधी ९० ते १०५ दिवसांचा धरला जातो; पण ९० दिवसांत येणाºया सोयाबीनची पेरणी सहसा शेतकरी करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे १०५ दिवसांत येणाºया जातीचीच पेरणी केली जाते, हा कालावधी कमी करू न हेक्टरी २२ क्विंटल उत्पादन देणारी एएमएस-१००१ (पीडीकेव्ही यलो) या नावाने नवीन जात विकसित करण्यात आली आहे. अगोदरच्या जातीपेक्षा या नवीन सोयाबीन जातीचे उत्पादन जास्त असल्याचा दावा संशोधन करणारे कृषी शास्त्रज्ञ करीत आहेत. या सोयाबीनपासून तेलाचे प्रमाणही २१ ते ४४ टक्के एवढे आहे. विषाणूजन्य रोगास प्रतिकारक असलेली ही जात आपत्कालीन परिस्थितीतही तग धरू न राहते म्हणजेच न लोळणारी, न फुटणारी ही जात आहे. 

भाताचेही संशोधनयाच कृषी विद्यापीठाने १४० ते १४५ दिवसांत हेक्टरी ३८ ते ४० क्ंिवटल उत्पादन देणारी एसवायई-५०३-७८-३४-२ तिलक या नावाने बारीक आकाराचा आकर्षक दाणा असणारी भाताची जात विकसित केली. कडा-करपा रोगास ही जात प्रतिबंधक आहे.

३६ तंत्रज्ञानाच्या शिफारशीशेतकºयांना भरघोस पीक घेता यावे, यासाठी तंत्रज्ञानाच्या ३६ शिफारशीही या कृषी विद्यापीठाने केल्या आहेत.

 सोयबीनची नवीन जात भरघोस उत्पादन देणारी असून, यात तेलाचे प्रमाण भरपूर असल्याने मोठी मागणी राहील. शेतकºयांना याचा चांगला फायदा होणार आहे. भाताची जातही भरपूर उत्पादन देणारी आहे.डॉ. विलास भाले, कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ