शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील वीज ग्राहकांकडून ५२४ कोटी रुपयांचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 18:06 IST

विदर्भातील ५४ लाख ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

अकोला : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांनी लॉकडाऊननंतर नियमित वीज बिल भरण्यास सुरुवात केली असून, आॅगस्ट महिन्यात विदर्भातील ५४ लाख ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. जून महिन्यात २५ टक्क्यांपर्यंत घसरलेल्या वीज बिलाच्या वसुलीचा आलेख आॅगस्ट महिन्यात उंचावला आहे.मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यानंतर वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या पाच परिमंडळांचा समावेश असलेल्या नागपूर प्रादेशिक विभागात एप्रिल महिन्यात केवळ ३७ टक्के ग्राहकांनी वीज बिल भरले होते. मे महिन्यात ही टक्केवारी ३१ टक्क्यांपर्यंत घसरली आणि जून महिन्यात तर ती २५ टक्क्यांपर्यंत खाली आली होती. त्यानंतर परिस्थिती सुधारली. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांना दिलासा देत ग्राहकांना बिलाचे हप्तेही पाडून दिले होते. तसेच लॉकडाऊन काळातील वीज बिलांचा एकत्रित भरणा करणाºया ग्राहकांना २ टक्के सवलत देण्यात आली होती. या काळात महावितरणकडून ग्राहकांशी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क, ग्राहक मेळावे, वेबिनार, विशेष मदत कक्ष, लोकप्रतिनिधी व परिसरातील ग्राहकांना माहिती देण्यासाठी व्हाट्स अ‍ॅप ग्रुप तसेच ग्राहकांच्या मोबाइलवर एसएमएस, बिल तपासण्यासाठी वेब लिंक आणि छापील वीज बिलवर बिलाची संपूर्ण माहिती इत्यादी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांचा संभ्रम दूर होऊन वीज बिल भरणाºया ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली.सर्वाधिक भरणा नागपूर परिमंडळातविदर्भातील सर्व जिल्ह्यांचा समावेश असलेल्या महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागात आॅगस्ट महिन्यात ५४ लाख ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटी रुपयांचे वीज बिल भरले. यामध्ये सर्वाधिक वीज बिल भरणा नागपूर परिमंडळातून झाला आहे. नागपूर परिमंडळातील १६ लाख ग्राहकांनी २४३ कोटी रुपयांचे वीज बिल भरले. अकोला परिमंडळातील ११ लाख ग्राहकांनी ६७ कोटी रुपये, अमरावती परिमंडळातील १२ लाख ग्राहकांनी ८६ कोटी रुपये, चंद्रपूर परिमंडळातील ७ लाख ग्राहकांनी ७५ कोटी रुपये तर गोंदिया परिमंडळातील ५ लाख ग्राहकांनी ५३ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरणnagpurनागपूर