शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

४९ लाख रूपये भाडे भरूनही परिवहन मंडळाच्या निळ्या बसेस ग्रामीण भागात धावेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 14:20 IST

४९ लाख रूपये भाडे परिवहन महामंडळाकडे भरूनही अनेक गावांमध्ये एसटी बस वाहतूक होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

- नितीन गव्हाळे

 अकोला: राज्य शासनाच्या मानव विकास कार्यक्रमातर्गंत ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थिनींना इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेता यावे, या दृष्टीकोनातून गाव ते शाळेदरम्यान एसटी बस वाहतूकीची सुविधा उपलब्ध केली. त्यासाठी ४९ लाख रूपये भाडे परिवहन महामंडळाकडे भरूनही अनेक गावांमध्ये एसटी बस वाहतूक होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ग्रामीण भागात एसटी बसेस धावत नसल्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.बेटी बचाव, बेटी पढाव...असा संदेश देणाऱ्या राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्वच मुलींना शिक्षण घेता यावे. या दृष्टीकोनातून मानव विकास कार्यक्रमातर्गंत मोफत सायकलींची योजना सुरू केली. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने गाव ते शाळेपर्यंत मुलींना बसगाडीची सुविधा मिळावी आणि मुलींना शाळेत जाता यावे. यासाठी गाव ते शाळेदरम्यान निळ्या रंगाच्या एसटी बस वाहतूक सुरू केली. त्यासाठी शासनाच्या जिल्हा मानव विकास समितीच्या मार्फत २१५ दिवसांसाठी अकोला परिवहन महामंडळाला निळ्या बसगाड्यांच्या फेºयांसाठी भाडे म्हणून सात तालुक्यांसाठी प्रत्येकी ७.४ लाख रूपये असे एकूण ४९ लाख रूपये दिले आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये गाव ते शाळा निळ्या बसगाड्या धावतच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निळ्या बसगाड्या येत नसल्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. ही गंभीर बाब असल्याने, जिल्हा मानव विकास समितीने नाराजी व्यक्त करीत, निळ्या बसेस नियमित आणि वेळेवर गाव ते शाळादरम्यान फेºया करतील. या दृष्टीने परिवहन विभागाने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportराज्य परीवहन महामंडळ