पातूर : मळसूर येथील ४0 कुटुंबांचे रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 08:49 PM2018-01-09T20:49:16+5:302018-01-09T20:51:26+5:30

मळसूर: पातूर तालुक्यातील सर्वाधिक कमी पाऊस पडणार्‍या मळसूर गावातील ४0 पेक्षा जास्त कुटुंबांनी रोजगाराअभावी स्थलांतर केले आहे. शेतकर्‍यांच्या हातचे पीक कमी पावसाने गेले. तसेच बागायती शेती करण्यासाठी विहिरीला पाणी नसल्याने मळसूर येथील शेतकरी व शेतमजूर हवालदिल झालेले आहे.

Patur: 40 families migrate to search for jobs in Malasur! | पातूर : मळसूर येथील ४0 कुटुंबांचे रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतर!

पातूर : मळसूर येथील ४0 कुटुंबांचे रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतर!

googlenewsNext
ठळक मुद्देरोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
मळसूर: पातूर तालुक्यातील सर्वाधिक कमी पाऊस पडणार्‍या मळसूर गावातील ४0 पेक्षा जास्त कुटुंबांनी रोजगाराअभावी स्थलांतर केले आहे.
शेतकर्‍यांच्या हातचे पीक कमी पावसाने गेले. तसेच बागायती शेती करण्यासाठी विहिरीला पाणी नसल्याने मळसूर येथील शेतकरी व शेतमजूर हवालदिल झालेले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व हाताला काम नसलेले मजूर व शेतकर्‍यांच्या ४0  कुटुंबांनी उदरनिर्वाह चालविण्यासाठी बारामती, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर इत्यादी शहरामध्ये जाऊन आश्रय घेतला आहे. या कुटुंबांमध्ये मळसूर येथील मंगेश पांडुरंग देवकते, संदीप गणेश देवकते, प्रकाश दशरथ देवकते, सुरेश सदाशिव देवकते, अमोल रमेश आवटे, कपिल मधुकर देवकते, सुनील दयाराम बुंदे, देवानंद प्रभाकर देवकते, सुरेश श्यामराव देवकते, दीपक गजानन देवकते, कैलास दशरथ देवकते, परमेश्‍वर देवकते, अनिल करे, किशोर नारायण तायडे, रामचंद्र विलास कंकाळ, दिनकर कंकाळ, भास्कर कंकाळ, संतोष कंकाळ, पांडुरंग कंकाळ, रवींद्र क्षीरसागर, किरण क्षीरसागर, विलास बरडे, श्रीकृष्ण बरडे, शिवा गायकवाड, शिवा करे, सागर मोरे, संतोष देवकते, अशोक कौळकार, विशाल कवडे, गोपाल करे, रामचंद्र पवार यांच्या कुटुंबासह एकूण ४0 कुटुंबांनी राज्यातील मोठय़ा शहरात स्थलांतर केले आहे. 

यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचे उत्पादन फारच कमी झाले आहे. तसेच बागायती शेतीसाठी पाणी नसल्याने येथील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर पोट भरण्यासाठी बाहेरगावी जाण्याची वेळ आली आहे.
- जगदीश देवकते, सरपंच, मळसूर

Web Title: Patur: 40 families migrate to search for jobs in Malasur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.