शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे प्रवाशांचे हाल; लाखोंची लूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:05 IST

अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, यासाठी महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेने १७ ऑक्टोबरपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या इशार्‍याकडे राज्याने लक्ष न दिल्याने सोमवारच्या मध्यरात्रीपासूनच कामगारांनी संप सुरू केला.

ठळक मुद्देदोन्ही आगारांमध्ये अडकल्या शेकडो गाड्या बारा लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, यासाठी महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेने १७ ऑक्टोबरपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या इशार्‍याकडे राज्याने लक्ष न दिल्याने सोमवारच्या मध्यरात्रीपासूनच कामगारांनी संप सुरू केला. रात्री उशिराने अकोला डेपोच्या गाड्या आल्या. त्या पुढे गेल्या नाहीत. इतर डेपोच्या गाड्या मात्र रात्रीच रवाना झाल्यात. सकाळपासून अकोला डेपो-१ आणि २ च्या चालक-वाहकांनी चक्काजाम सुरू केला. त्यामुळे सणाच्या तोंडावर हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत. अकोला डेपो १ मधील ४५ आणि डेपो २ मधील जवळपास ७0 गाड्या अकोल्यातच अडकल्यात. त्यामुळे डेपो एकचे ४ लाखांचे आणि डेपो दोनचे ८ लाखांचे नुकसान झाले. दिवाळीनिमित्त घराकडे निघालेल्या प्रवाशांची झालेली कोंडी पाहून खासगी लक्झरीचालकांनी, अक्षरश: लूट केली, त्यामुळे प्रवाशांना मागणार तेवढे भाडे द्यावे लागले.

पारस-अकोला-अकोट-अकोला एकमेव गाडी धावली            अकोला डेपो क्रमांक दोनची एमएच ४0-८८३४ क्रमांकाची बसगाडी मंगळवारी पारस-अकोला, अकोला-अकोट आणि अकोट-अकोला अशी धावली. या गाडीला प्रवाशांनीदेखील प्रतिसाद दिला. या गाडीवर  शिवसेनाप्रणीत कामगार सेनेचे उपाध्यक्ष पुंडलिक भोंगे हे चालक होते. या आंदोलनास त्यांचा व्यक्तीशा पाठिंबा नसल्याने, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी २५ प्रवाशांना सेवा दिली. भोंगे यांच्या या हिमतीचे कौतुक करीत आरटीओ अधिकारी आणि शहर वाहतूक शाखेच्यावतीने त्यांचा येथे सत्कार करण्यात आला. अकोट येथे माजी आमदार संजय गावंडे यांनीही सत्कार केला. याप्रसंगी डेपो सचिव देवीदास बोदडे, आगार प्रमुख ए.पी. पिसोडे, जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.

शिवशाही अडकली. तीन गाड्या रवानालांब पट्टय़ाच्या तीन बसगाड्या अकोल्यातून रवाना झाल्यात. त्यामध्ये नागपूर-पुणे, पुणे-नागपूर आणि दुसरी एक नागपूर-पुणे रवाना झाली; मात्र शिवशाही अकोला-पुणे मात्र अकोल्यातच अडकली. मंगळवारी रात्री ८ वाजता ही गाडी रवाना होणार होती; मात्र ती अकोल्यातून निघू शकली नाही.

खा. संजय धोत्रे, आ. सावरकरांची धावअकोला डेपो क्रमांक दोनवर काही प्रवासी अडकले असल्याची माहिती खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांना मिळाली. त्यांनी लगेच बसस्थानकावर धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. एसटी कामगारांच्या संपकरी पदाधिकार्‍यांशी चर्चा करून नागरिकांची कोंडी सोडविण्याचे आवाहन केले. कामगारांच्या मागण्या रास्त असून, याबाबत नेत्यांशी चर्चा केली जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिलेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ