शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले चित्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:02 IST

चित्रांची विक्री आणि व्यक्तिचित्रांमधून येणारी रक्कम पूरग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी दिली जाणार आहे.

अकोला: कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील आघाडीचे शंभर चित्रकार सरसावले आहेत. चित्रांची विक्री आणि व्यक्तिचित्रांमधून येणारी रक्कम पूरग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी दिली जाणार आहे. चित्र प्रदर्शन पुणे येथे गुरुवारपासून सुरू झाले आहे. यामध्ये अकोल्यातील चित्रकार पद्मजा पिंपळे व सतीश पिंपळे यांचा समावेश आहे. प्रदर्शन २५ आॅगस्टपर्यंत चालणार आहे.दक्षिण महाराष्ट्रात महापुराने हाहाकार केला. राज्यासह परराज्यातील संस्था, व्यक्ती मदतीसाठी धावले. यामध्ये आता चित्रकारांनीही पुढाकार घेतला आहे. राज्यातील आघाडीचे शंभर चित्रकार या उपक्रमासाठी एकवटले. प्रदर्शनात या चित्रकारांच्या कलाकृती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. जास्तीत जास्त चित्रांची विक्री व्हावी, या उद्देशाने एक फूट बाय एक फूट आकाराच्या कलाकृतीची किंमत पाच हजार ठेवली आहे. याशिवाय प्रदर्शनस्थळी चित्रकार प्रत्यक्ष व्यक्तिचित्र रेखाटन करीत आहेत. प्रथितयश चित्रकारांकडून पाचशे रुपयांत पेन्सिल आणि चारकोल प्रकारातील व्यक्तिचित्र काढून दिले जात आहे. या उपक्रमात काही चित्रकारांनी आपल्या कलाकृती दान केल्या आहेत. चार दिवसीय या प्रदर्शनात अधिकाधिक कलाप्रेमी चित्रांची खरेदी करू न, पूरग्रस्तांसाठी मदतीचा हातभार लावत आहेत.प्रदर्शनातून जमा होणारा निधी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी दिला जाणार आहे. पुरात अनेक शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. शाळेतील साहित्य, पुस्तके, वह्या, संगणकांचे नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होणार आहे. शाळांना वेळेत शैक्षणिक साहित्य मिळावे, यासाठी हा मदतनिधी दिला जाणार आहे. शिवाय, पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, कपडे आदी शैक्षणिक साहित्यही पुरविले जाणार असल्याचे सतीश पिंपळे यांनी सांगितले. रोटरी क्लबचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर