शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’ प्रवेशाची दोन हजारावर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:58 IST

२0१ शाळांमध्ये २ हजार २७८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली; परंतु सध्या शाळा बंद असल्यामुळे प्रवेश रखडले आहेत.

अकोला: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्राथमिक शाळांमधील प्रवेश प्रक्रिया रखडलेल्या आहेत. आर्थिक दुर्बल घटकामधील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’नुसार इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. अकोला जिल्ह्यातून ७ हजारांवर पालकांनी राखीव जागांसाठी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी २0१ शाळांमध्ये २ हजार २७८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली; परंतु सध्या शाळा बंद असल्यामुळे प्रवेश रखडले आहेत.यंदा ‘आरटीई’च्या २५ टक्के जागांसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते. जिल्ह्यातील २0१ शाळांनी ‘आरटीई’साठी नोंदणी केली होती. यानुसार जिल्हाभरातून ७ हजार ३३३ पालकांनी आॅनलाइन अर्ज केले होते. शिक्षण विभागाने लॉटरी पद्धतीने एकूण २ हजार २७८ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केली; परंतु सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्या कधी सुरू होतील, याविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे पालकांना शाळेत जाऊन पहिल्या वर्गामध्ये प्रवेश कसा घ्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर जाहीर करण्यात येईल. त्यानंतर पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे; परंतु अद्यापपर्यंत कोणतीही सूचना पालकांना न मिळाल्यामुळे पालक संभ्रमात आहेत. याविषयीची पालकांना चिंता सतावत आहे.प्रतीक्षा यादीतील पालकही लटकले!जिल्ह्यातील अनेक पालकांना प्रतीक्षा यादीत नाव असल्याचे संदेश आले आहेत; परंतु २५ टक्के जागांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचेच प्रवेश रखडले आहेत. त्यांचे प्रवेश निश्चित झाल्याशिवाय प्रतीक्षा यादीतील पालकांना प्रवेशासाठी स्थान मिळणार नाही. त्यामुळे या पालकांनाही प्रतीक्षा यादीतून नाव निघून आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी प्रतीक्षा करणे भाग पडत आहे.शाळांकडून आॅनलाइन प्रवेश प्रक्रियाकोरोनामुळे शाळा बंद आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी समूह एकत्र येण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी, अशी चिंता शाळांना सतावत होती. त्यावर मात करण्यासाठी शहरातील अनेक नामांकित शाळांनी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. याला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळांमध्ये आॅनलाइन प्रवेश देत आहेत. तसेच डोनेशन, शैक्षणिकसुद्धा आॅनलाइन भरीत असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी